मी माझी मला का न वाटे
ह्या उभ्या जगात सोनेरी काटे
प्रत्येक क्षण आपला भासला
प्रत्येक क्षणाला घट्ट कवटाळला
माझे माझे म्हणून कवटाळून बसले
सगळेच फोल होते हे का न कळले
रोज वाटे आज मी काहीतरी मिळवीन
माझी ओळख मी जगाला नक्की दाखवीन
असतील जरी नवी उत्तुंग शिखरे मनात
वारा दिशा बदलतो, हे ना समजे क्षणात
क्षणात सगळे हातातून दूर निसटती
निसटलेल्या वाळूचे कण मागे राहती
नाती-गोती, यश-अपयश, मान-अपमान
सगळेच शेवटी वाटे शून्या समान
वाटे सगळे जग सोबत नसू दे
मी तरी माझ्यासोबत असू दे
न च वाटे तीही खात्री पाहता
हे शरीर हे मनही वेगळे वाटे आता
माझे अस्तित्व ह्या शब्दांत आहे
की विचारांची जननी माझ्यात राहे
दिले जे नाव मला समाजाने
ते तरी माझे आहे, हे का मानावे मनाने
प्रश्नांची ह्या उत्तरे मिळतील का कधी
मी तरी माझी आहे का, हे कळेल का आधी

– रचना : तनुजा प्रधान, अमेरिका.
🌹खूप सुंदर रचना 🌹
भावस्पर्शी
उत्तर लेखन कवयत्री
🌹धन्यवाद 🌹
तनुजा प्रधान
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद सर!🙏🌷🌿