Thursday, September 18, 2025
Homeयशकथाज्ञानमूर्ती शेषराव चव्हाण

ज्ञानमूर्ती शेषराव चव्हाण

दादा म्हणजे आमच्या तन्मयीचे आजे सासरे, तन्मयी च्या ‘अहो’ चे आजोबा आणि तिच्या सासूबाई सौ शोभा ताईंचे वडील या नात्यातून दादा परिचित होते. दादा म्हणजे ज्ञानमूर्ती शेषराव चव्हाण !

त्यांचा ग्रंथसंग्रह, त्यांनी लिहिलेली पुस्तकं याबद्दल माहित होते पण निवांत भेट झाली नव्हती. अनेक वर्षांची ती इच्छा नुकतीच पूर्ण झाली.

दोन दिवसांपूर्वी दादांचा फोन आला, “मी पुण्यात आलो आहे, आपण भेटू.” या फोन मुळे मन मोहरुन गेले आणि सकाळी ११ वाजता त्यांना भेटलो. दादा ८८ वर्षांचे तरुण आहेत ! त्यांचा उत्साह, अभ्यासक वृत्ती तरुणाला लाजवेल अशी आहे.

“वाचन व लेखन ही माझी साधना आहे” असे म्हणणाऱ्या दादांनी स्वेच्छा निवृत्ती नंतर, ३२ पुस्तकं लिहिली आहेत. आणि तीही इंग्रजी भाषेत ! इतकं विपूल लेखन ही अचंबित करणारी बाब आहे.

 

पुस्तकांचे विषय तरी किती विविध आहेत हे काही नावं पहिली तरी लक्षात येते –
1) The Makers of Indian constitution – Myth and Reality
2) Ambedkar – Saviour of Untouchables
3) Mahatma Gandhi- Man of Millennium
4) Gandhi- Jinnah Talks
5) The Betrayal of Dr Babasaheb Ambedkar
6) Jammu and Kashmir- Paradise turned in to Hell
7) Hindu Muslim Relation from Gazni to Gandhi
8) Sardar Patel-A Man of Few Words and many Triumphs

ही काही वानगी दाखल नावं. याशिवाय सालिम अली, चंद्रशेखर धर्माधिकारी, शरद पवार यासारख्या अनेक महनीय व्यक्तींची चरित्र आणि यावर्षी प्रकाशित झालेलं –
Narendra Modi -Swayam Sevak to Pradhansevak

सोशल एज्युकेशन ऑफिसर या पदापासून सुरुवात करत एक एक पायरी वर चढत मराठवाडा विद्यापीठाचे असिस्टंट रजिस्ट्रार, परीक्षा नियंत्रक, रजिस्ट्रार अश्या स्तरांवर काम करीत 1990 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लेखन, मनन, चिंतन यातून 32 पुस्तकांची निर्मिती केली.

आंबेडकर, गांधी हे त्यांच्या चिंतनाचे विषय. एम. व्ही. कामत म्हणतात, “I cannot think of any person in contemporary India, who can speak or write more authoritatively on Dr B.R.Ambedkar than Sheshrao Chavan.”
हे विधान किती सत्य आहे, हे आंबेडकरांवरील त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरुन दिसते.

I am follower of Robert Frost असं म्हणणाऱ्या दादांकडून अनेक नवीन विषयांवर लिखाण होवो.
दादांनी त्यांची चार पुस्तकं दिल्यानं माझे ग्रंथालय समृद्ध झालं आहे.
दादांना उदंड आयुष्य लाभो हीच मनोकामना.

– लेखन : दीपक पळशीकर. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा