चंद्रकळा ठिपक्यांची
बाई बाई बाई बाई
चंद्रकळा ठिपक्यांची
जरतारी ही कलाबुतांची
पदरावरती मोर पिसांची
आंगी लेऊन सजली काया
हौस भागते आयुष्याची
सुखदुःखांचा विणला पदर
श्रावण ग्रीष्म सजते अधर
कंचुकी लेवुन सप्तसुरांची
घडी उघडली सौभाग्याची
षड्रिपुंचे धागे विणुनी
नऊ रंध्राचे लुगडे नेसुनी
कृष्णरंगी आत्ममग्नी
साडी मी नेसली रंगाची
चंद्रकळा ठिपक्यांची
ठिपक्याइतुके सरली वर्ष
जीवनी बरसे कान्हा हर्ष
सुखदुःखात असेन सहर्ष
शपथ घेतली मी कान्हाची
बाई बाई बाई
चंद्रकळा ठिपक्यांची
– रचना : प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली, बेळगाव.
गौळण कविता अप्रतिम. निसर्गवर्णन आणि मानवी भावनांची सुंदर सांगड घातली आहे.
वाह वाह मस्त
डॉ जोशी