“उस बेहद मिठी चाय के साथ ही जिंदगी की सारी मिठास कडवाहाट मे बदल जायेगी ये नहीं जनती थी मैं. “बानो चे डोळे भरून वाहत होते. ती इथे नव्हतीच ती त्या पावसात तिथेच भिजत होती जणू. मी ही थांबवलं नाही आज तिला. वाहून जाऊ दिल्या खरपूस जखमा वरच्या ओल्या झालेल्या खपल्या. बानो आधी म्हणाली होती तिचं लग्न ठरलं होतं पण ती खुश नव्हती, कारण ती एवढीशी पोर आणि तो चाळिशीच्या पुढचा माणूस होता. आधीच त्याचे दोन लग्न झाले होते. तीन मुलं होती. अत्यंत दारिद्र्य या निरागस मुलींना अश्या परिस्थितीत ढकलून देतं. यात कोणी आणि कोणाला दोष द्यावा हेच कोडं असतं. नियतीचा निर्णय म्हणून फक्त मान्य करायचं असतं.
त्या तिघींनी तो अती गोड चहा संपवला आणि छतावरून गाळणाऱ्या पावसाच्या पाण्याने त्या कप बश्या पण स्वच्छ केल्या. बानो पुढे म्हणाली, “दिदी, चाय पिने के बाद थोडी देर मे बारिश कम होती दिखाई दे रही थी. लेकीन सामने वाला कच्चा रस्ता न जाने क्यू धुंधलासा दिखाई दे रहा था. मैने सोचा बारिश की वजह से धुंधला दिख रहा है. फिर पीछे के दरवाजे की आवाज आई, चौकीदार चाचा आ रहे थे लेकीन वो मुझे ठिक से दिखाई नहीं दे रहे थे. मैने उन दोनो सहेलियो की तरफ देखा तो वो सिर पकडकर निचे बैठी थी. फिर चक्कर सा आ गया मुझे”.
बानो ने आपली ओढणी भिजलेल्या डोळ्यावर, गालावर फिरवली आणि जड झालेले श्वास जरा रांगेत लावले. पिंपळाच्या झाडावर एक नजर टाकून ती पुढे म्हणाली, “जब निकह तय हुआ मेरा तो बहोत रोई थी. बाद में ये सोचकर खुद को समझा लिया था, के पेटभर खाना खाने को तो मिल ही जायेगा सासुराल मे. अम्मी कहती थी, खा ने पिने की कोई कमी ना हैं उन के यहाँ. बस इस बात से ही तसल्ली कर ली थी. कुछ आखरी दीन बाकी रह गये थे स्कूल जाने के. अम्मी गुस्सा भी करती थी. मना भी करती थी. घर के कामो मे ध्यान देने की बोलती थी. लेकीन मैं थी की मानती नहीं थी. भाग भाग कर स्कूल जाती थी. जी लेना चाहती थी उस उधार की खुशी को. आज उसी स्कूल से बरबादी की कहानी लिखी गयी जहाँ से कलम हात मे आयी थी. मेरी सारी अच्छी वाली यादे उसी स्कूल के मिट्टी के आंगन मे फैली थी.
उस टूटे छत से जब सूरज झांकता था तो जैसे आखो मे रोज नई उम्मिद वाली रोशनी भर जाती थी. वो सफेद चूने से लिपी हुई दिवारे उसके किसी कोने मे अपना नाम लीखकर मानो उसपर अपना हक समझती थी मैं.
बानो शांत झाली आणि हातातला कागदं कुरवाळू लागली. मग म्हणाली, “चक्कर सा आया था. और उसके पहले चाचा हमारी तरफ आ रहे थे. उस के बाद जब आंखे खुली तो देखा…”
क्रमशः

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
राणी जी, लालबत्ती मधील हकिकती वाचतांना मन विदीर्ण होतं. का या अश्राप मुलींच्या भाळी हे आले या विचारांनी जीव कासावीस होतो, त्यांना फसवणाऱ्यांचा संताप येतो आणि सुशिक्षित धडधाकट आपण या विरुद्ध काही करू शकत नाही म्हणून स्वत:चा ही राग येतो नि पुढच्या क्षणाला असहाय्य वाटते.मन नंतर कशातच स्थिर होणे कठीण जाते.
दु:ख हेच एकमेव सत्य जीवनी
त्यातही हसायचा सराव पाहिजे…
…( संगीता जोशी)