पुस्तक प्रयोगशाळा खुले विचार दालन
असते मार्गदर्शक गुरु भांडार ज्ञान ।।ध्रु।।
असते पुस्तक वाचन शांत संभाषण
करते विहार मने अनोख्या प्रदेशांतून
किमया दाविते होई गुढाचे आकलन ।।1।।
शिकवते मनोबल घडवे परिवर्तन
असते आचार सुप्त संभाषण मंथन
उभारी देते बहुमूल्य सामर्थ्य आनंद ।।2।।
बनवते विभोर अंतर मनांत जाऊन
असते अस्तित्व शरीर आत्मा मित्र राहून
वाढवते प्रतिष्ठा प्रतिभा सुसंस्कृत पण ।।3।।
असते पुस्तकाला पाठ पोट चेहरा पान
पान शोधण्यासाठी असते निशाण खूण
करावयाचे असते पानातील रसग्रहण ।।4।।

रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड.