काही माणसे समुद्रासारखी असतात
काही माणसे तुफानी वादळातील नौकेच्या
शिडासारखी असतात
स्वतः भरकटतात तरी पथदर्शक बनतात
काही जीवनभर स्वतःसाठीच मार्ग शोधत असतात
काही चंदनासारखे झिजतात
तर काही फुलासारखे सजतात
काही दिव्यासारखे जळतात
काही विचारासाठी मरतात
काही दिपस्तंभासारखे असतात
काही वावटळीप्रमाणें भासतात
काही कापरासारखे जळतात
काही कोळशासारखे धगधगतात
काही मात्र फुलांप्रमाणे फुलतात, दरवळतात
अन् नंतर निर्माल्य होतात
काही अस्तित्वासाठी झटतात
अन् काही ध्येयासाठी लढतात
मी मात्र क्षणभंगुर
विचाराचा नविनच फुललेला अंकुर
धरतीतुन मार्ग काढीत
विश्वाला कवेत घेणारा एक बिजांकूर
फुललेल्या फुलातुन रस शोषनारा
मी तो फुलपाखरू
देवा, मला ही दे तो स्वच्छंदीपणा
अन् मधासारखा मलाही जन्मोजन्मी स्त्रवू दे…
– रचना : शिल्पा तगलपल्लेवार गंपावार.
केमन आयलांड्स
🌹खूप छान कविता 🌹
शब्दरचना अप्रतिम
🌹nice शिल्पा जी 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ