“वाढदिवस तुमचा : आनंद सर्वांचा” या उपक्रमांतर्गत हजारो वाढदिवस आयोजित करत असताना स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी नेत्ररोग तज्ञ तथा अध्यक्ष, प्रभात ट्रस्ट-नवी मुंबई, डॉ प्रशांत थोरात यांनी सपत्नीक नाका कामगारांची नेत्रसेवा केली व आईने स्वतः बनविलेली भडंग कामगारांना अल्पोपहार म्हणून वितरित केली.
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आलेला त्यांचा वाढदिवस रक्तदानाच्या माध्यमातून साजरा करण्याची संकल्पना त्यांचे वडील कै. प्रा. बी आर थोरात (आप्पा) यांनी दिली. फक्त संकल्पना न देता त्यांनी स्वतः डॉक्टरांसोबत रक्तदान केले व सामाजिक कार्याचा आदर्श रुजवला.
पण आज वाढदिवसानिमित्त रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री यांच्या उपस्थितीत टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये रक्तदान करताना त्यांच्या बाजूची खुर्ची रिकामी होती. या रिकाम्या खुर्चीकडे पाहताना वडिलांच्या आठवणीने त्यांच्या पापण्यांच्या कडा नकळतच ओल्या झाल्या, कंठ दाटून आला. जणू काही ती रिकामी खुर्ची वडिलांनी दिलेल्या बाळकडूची आठवण करून सेवा कार्याची प्रेरणा देत होती. याच प्रेरणेतून विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचे स्मरण करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहेत.
सर्वांनी विविध माध्यमातून डॉक्टरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभारी मानून भविष्यात सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याचा आपण संकल्प करू यात,असे आवाहन केले आहे.
रक्तदान श्रेष्ठदान..!
– टीम एन एस टी. ☎️ 9869484800
प्रशांत थोरात यांची स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याची समाजाभिमुख
कल्पना अतिशय आदर्शवत!