हाक मुक्या जिवांची, तहान त्यांची भागविण्याची
त्यांना हवेय चिमुटभर धान्य आणि घोटभर पाणी !
या वर्षी उन्हाच्या झळा भाजून काढत आहेत. उन्हापासून दक्षतेचे सर्व उपाय करुनही जिवनावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या धडधाकट माणसाला कधी एकदा घराच्या गारव्यात जातो अशी तीव्र इच्छा होत आहे. आपलेच असे हाल होताहेत तर पशू,पक्ष्यांचे किती हाल होत असतील ? होरपळुन काढणाऱ्या या कडाक्याच्या उन्हात दोंनचार दाणे मिळण्यासाठी आणि तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची केविलवाणी धडपड सुरु असल्याचे पाहून, आपल्या डोळ्यात पाणी येते.
खरंच पक्ष्यांच्या ह्या धडपडीला सुसह्य कसे करता येईल ? यासाठी आपण आपल्या परिसरातील पक्षी मिंत्राबरोबर पक्ष्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्याची गरज आहे.
चिमूटभर धान्याची व वाटीभर पाण्याची आता त्यांची गरज भागविण्याची ही खरी वेळ असून पर्यावरण रक्षणासाठी हे प्रयत्न नक्कीच फलदायी ठरतील.
उन्हाच्या प्रखर झळांमध्ये पक्ष्यांची जगण्यासाठीची ससेहोलपट थांबवण्यासाठी आता पक्षी वाचवू या. यासाठी अनेक पक्षीप्रेमी घरटी व पाण्याचे भां🎂0डे ठेवत आहेतच. पण पक्ष्यांसाठीच्या जाणिवेचा हा ओलावा आणखी वाढवण्यासाठी साऱ्यांकडूनच बळ मिळण्याची गरज आहे.
आपल्या व पिलांच्या भुकेसाठी उन्हाचे चटके झेलत दिवसभर ठिकठिकाणी घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यांसाठी त्यांना आवडणारे खाद्य व पाणी देण्याची इच्छा अनेकांची असते. पण त्या इच्छेला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी सर्व जण प्रयत्न करू या …🌿🌿
– लेखन : विजय होकर्णे. पक्षीमित्र, छायाचित्रकार नांदेड.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
बरोबर आहे.विजयजी..
निसर्गातल्या चराचरांची काळजी घेणं हे मानवाचं कर्तव्य आहे…