Tuesday, September 16, 2025
Homeबातम्याप्रामाणिक भंगारवाले

प्रामाणिक भंगारवाले

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात भंगार व कचरा गोळा करणाऱ्या दोघांनी माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना उरण मध्ये घडली आहे. यामुळे आजही माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण सर्वांना एकदा अनुभवास मिळाले.

सविस्तर घटना अशी की, 7 मे रोजी मासेमारी व्यवसाय असणाऱ्या करंजा कासवले पाडा येथील रहिवासी, 33 वर्षीय सुशाली धनंजय नाखवा यांची 10 वर्षीय मुलगी विधी हीची प्रकृती बिघडली. तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी त्या, त्यांच्या अँक्टीव्हा मोटार सायकलने करंजा कासवले पाडा ते नाखवा हाॅस्पीटल, कोटनाका येथे जात होत्या. त्यांच्याजवळ असलेल्या काळया रंगाच्या पर्स मध्ये 10 हजार रुपये रोख, मोबाईल व मुलीच्या औषधोपचारा करीता पैसे कमी पडत असल्याने सोनाराकडे गहाण ठेवण्याकरीता सोबत ठेवलेले साडेतीन तोळे सोन्याचे मंगळसुत्र असा ऐवज होता. त्या आनंदी हाॅटेल जवळ आल्या असता रस्त्यात पर्स पडुन गहाळ झाली.

ही पर्स परत मिळावी या करिता तक्रार देण्यासाठी नाखवा उरण पोलीस ठाणे येथे आल्या. त्याचवेळी तिथे भंगार व कचरा गोळा करणारे अश्रफ असगर शेख, वय 18 वर्ष व अमित लालजी चौधरी, वय 23 वर्ष, दोन्ही रा.बोरी पाखाडी हे त्यांना सापडलेली काळया रंगाची पर्स व त्यातील ऐवज मुळ मालकाला परत मिळावा या करिता पोलीस ठाण्यात आले.

यावेळी त्यांनी जमा केलेली पर्स सुशाली नाखवा यांना दाखवुन व खात्री करून परत करण्यात आली.

या दोघांनी रस्त्यावर सापडलेली पर्स, त्यातील ऐवजासह प्रामाणिकपणे परत करुन माणुसकीचे दर्शन घडविले.

आजच्या स्वार्थी दुनियेतही या दोघांनी दाखविलेल्या माणुसकी मुळे, प्रामाणिकतेमुळे उरण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या टीम ने या दोघांचा रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विठ्ठल ममताबादे.

– लेखन : विठ्ल ममताबादे. उरण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️  9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. माणुसकी खरंच जिवंत आहे.

    धन्यवाद त्या लोकांचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments