डिस्कोकिंग
लोकप्रिय संगीतकार बप्पी लाहिरी यांचा जन्म
27 नोव्हेंबर 1952 रोजी झाला. त्यांचे खरे नाव अलोकेश लाहिरी होते. ते 3 वर्षांचे असताना तबला वाजवायला लागले. चौदाव्या वर्षीच त्यांनी प्रथम संगीत दिले.
बप्पी लहान असताना, त्यांना एस डी बर्मन यांचे संगीत आवडत असे. ते, ते कायम ऐकत. आपणही असेच संगीतकार बनावे असे त्यांना वाटत असे.
1973 ला नन्हा शिकारी पासून सुरवात करून, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याआधी बंगाली फिल्म ला पण संगीत दिले पण त्यांना यश पाहण्यासाठी 1975 उजाडावे लागले. ताहिर हुसेन यांच्या “जखमी” मधून त्यांनी प्ले बॅक सिंगिंग ला पण सुरवात केली.
किशोरदा, जे बप्पीचे मामा होते, त्यांचा बप्पी यांच्या यशात खूप मोठा आहे. यानंतर 1976 ला चलते चलते ला संगीत देऊन बप्पी यांनी सर्व रेकॉर्ड मोडले. यातील सर्व गाणे सुपरहिट झाले. कभी अलविदा ना कहेना कायमच आजही गुण गुणले जाते. हे बप्पी यांच्या संगीत आणि किशोरदा चा आवाज या यशाची पावती.
आवाजाचे बोलाल तर बप्पीचां आवाज पण कुठे कमी पडला नाही. “बंबई से आया मेरा दोस्त” असो, यार बिना चैन कहा रे। दिल मे हो तुम । याद आ राहा है तेरा प्यार । तमा तमा लोगे हे त्यांनी गायलेले काही गीतं.
बप्पी लाहिरी यांचा सुवर्ण काळ 1982 पासून सुरू झाला. डिस्को डान्सर सुपरडुपर हिट यातील सर्व गाणी भारतात आणि परदेशात गाजले जिमी जिमी आय एम डिस्को डान्सर हे सर्वच मिथुन हिरो आणि बप्पीचें संगीत. डान्स कसम पैदा करणे वाले की या जोडीने सर्व म्युझिकल हिट दिले.
अजून एक जोडी जितेंद्र – श्रीदेवी या जोडीचा 1983 चा हिम्मतवाला सुपरहिट. बप्पीचे संगीत आहे.
त्यानंतर तोहफा, मवाली, जस्टीस चौधरी, अमिताभ बच्चन बरोबर नमक हलाल, 1982 शराबी, 1984 पग घुंगरू बांध मीरा नाचिती, मंजिले अपणी जगह है या फिल्म्स च्या गीताला बेस्ट म्युझिक, तसेच किशोरदा ला बेस्ट प्ले बॅक सिंगर अवॉर्ड मिळाले.
या डिस्को दौरात आवाज दी है। किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, असे वेगळे संगीतकार बप्पीदा पुरेशी वेळ देऊन आपला वेगळेपणा दाखवला.
बप्पी लहिरी ची अजून एक ओळख गोल्डमॅन. जी शेवटपर्यंत जपली. आलिशा चिनोय टारजण माय टारजन शेरॉन प्रभाकर आ मेरी जैसी हसीना का दिल विजय बेनडीक्ट आय एम ए डिस्को डान्सर उषा उत्त्युप हरी ओम हरी कोई यहा नाचे नाचे तू मुझे जान से भी प्यारा है या दोन गाण्यात स्वतः बप्पी चा पण आवाज आहे. 1980 चा दशक पूर्ण डिस्कोमय केले असे संगीतकार गायक बप्पी लाहिरी. डिस्को डान्सर, नमक हलाल ,शराबी, तोहफा, हिमतवाला, “डान्स डान्स सुरक्षा “टारजन साहेब चलते चलते असे अनेक चित्रपट आहे ज्याचे संगीतमुळे कायम स्मरणात राहतील. डिस्को डान्सर चे याद आ रहा है तेरा प्यार हे गीत किशोरदा बाहेर असलेमुळे स्वतःचे आवाजात रेकॉर्ड केले जेव्हा किशोर कुमार नी ऐकले तेव्हा हे छान झाले बोलले. माझे आवाजात रेकॉर्ड करायची गरज नाही आणि आज इतके वर्षांनी पण तेवढेच फ्रेश वाटते.
अशा ग्रेट गायक संगीतकार, बप्पी नाही लाहिरी 16 फेब्रुवारी 2022 ला केवळ 69 व्या वर्षी सर्वाना सोडून गेला पण म्हणतात ना, असे महान लोक कधीच जात नसतात.
ते आपल्या कलेने आपल्यातच असतात आणि म्हणतात, “कभी अलविदा न कहना” अशा ग्रेट गायक संगीतकारास भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

– लेखन : संदीप भुजबळ. संगमनेर.

संदीप मित्रा किती सुंदर लिहितोस. संगीत ही तुझी आवड आहे आणि या क्षेत्रात असाच कार्य करत रहा. तुझ्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
#फारच सुंदर लेख
अंगातल्या सोन्यासारखे बप्पीदांचे म्युजिक पण बावनकशी सोने आहे.
भप्पी लहरी यांच्या जीवनकार्याचा योग्य आढावा.
👍👍👍👍👌👌👌
👍👍👍