नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींच्या गटाने आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या फ्लेमिंगो फेस्टीव्हलचे कौतुक करत, पाणथळ क्षेत्राचे संरक्षण अत्यावशक आहे यावर नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांनी जोर दिला.
फ्लेमिंगोंची उपस्थिती अकस्मात वाढलेली नाही, तसेच ही स्थिती नवी मुंबई प्रदेशातील प्रचंड मोठया जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करणारी असल्याचे बांगर म्हणाले. पर्यावरणप्रेमीनी आयोजित केलेल्या फ्लेमिंगो फेस्टीव्हलचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या महोत्सवाचे आयोजन दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस), नेरूळ येथे शनिवारी जागतिक स्थलांतरीत पक्षी दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन नाटकनेक्ट फाऊंडेशन, खारघर वेटलँडस् अँड हिल्स तसेच सेव्ह द नवी मुंबई एनव्हायर्नमेंट यांनी संयुक्तपणे केले होते.
हे शहर आता फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपाला येत असून या महोत्सवामुळे आणखी एक निराळी ओळख प्राप्त झाली असल्याचे बांगर यांनी सांगितले.
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्साहाचे बांगर यांनी कौतुक करून लहानशी फेरी काढत पर्यावरणाप्रती आपल्या प्रेमाचे प्रदर्शन केले.
“अलीकडे पर्यावरणाविषयी गप्पा करणं ही एक फॅशन झाली आहे,” असे ते म्हणाले. निसर्गाचे रक्षण करण्याप्रती प्रत्येक व्यक्ती सजग असलीच पाहिजे हे त्यांनी ठासून सांगितले. या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, अशाप्रकारचे कार्यक्रम आपल्या पाणथळी आणि कांदळवनांचे रक्षण करण्यात भरीव योगदान देतात.
क्लेमेंट बेन, अतिरिक्त प्रधान वन संरक्षक (वन्यजीव)- पश्चिम म्हणाले की, ढासळलेल्या पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी हा फ्लेमिंगो फेस्टीव्हल चांगल्या पद्धतीने जगजागृती करणार आहे. ही लोक चळवळ ठरेल असेही ते म्हणाले.
नाटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी.एन.कुमार म्हणाले की, नवी मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रातील लोकांनी मोठा रस दाखवून महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी आयोजित प्रदर्शनात वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्ग प्रेमींनी फ्लेमिंगो आणि जैवविविधतेविषयक कॅमेराबद्ध करण्यात आलेली 70 छायाचित्रे मांडण्यात आली होती.
स्थलांतरीत पक्षी हे पर्यावरण दूत असल्याचे कुमार यांनी नमूद केले. आपल्या पाणथळीच्या संवर्धनात लोक सहभाग सशक्त केला पाहिजे असेही ते म्हणाले.
सेव्ह द नवी मुंबई एनव्हायर्नमेंटचे सुनील अगरवाल म्हणाले की, अधिकाऱ्यांकडून पर्यावरणाच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष झालेले असून त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे.
खारघर वेटलँडस् आणि हिल्सच्या ज्योती नाडकर्णी म्हणाल्या, आगामी वर्षांतही फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येतील.
लहान मुलं उद्याचे जबाबदार नागरीक असल्याने त्यांच्यात पर्यावरण जनजागृतीची गरज असल्याचे डीपीएसचे मुख्याध्यापक जे मोहंती म्हणाले.
या कार्यक्रमाचे आयोजन नाटकनेक्ट फाऊंडेशन, खारघर वेटलँडस् अँड हिल्स तसेच सेव्ह द नवी मुंबई एनव्हायर्नमेंट यांनी संयुक्तपणे केले होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800