पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे काल मान्यवरांच्या हस्ते शानदारपणे उद्घाटन झाले.
प्रत्यक्ष नेत्रालय सुरू होण्यापूर्वीचा हा या नेत्रालयाचा उद्घाटन सोहळा उपस्थित सर्वाँनाच “नवी दृष्टी” देणारा ठरला.
या उद्घाटन सोहळ्यास सर्व प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि एकमेकांवर खेळीमेळीच्या वातावरणात केलेल्या कोट्या यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली राजकीय परंपरेचे दर्शन उपस्थितांना घडवून मोठाच आनंद आणि दिलासा दिला.
या प्रसंगी बोलताना डॉ तात्याराव लहाने यांनी हे नेत्रालय ५० टक्के रुग्णांना पूर्णपणे मोफत तर ५० टक्के रुग्णांना “ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर सेवा देईल असे सांगून त्यांच्या सेवा वृत्त्तीचे मनोरम दर्शन घडविले.
तर पर्यावरण, पर्यटन मंत्री, मुंबईचे पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी वरळीत किंवा मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेत्र रुग्णालय सुरू करू, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, मंत्री सर्वश्री बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, सुनील केदार, अमित देशमुख, माजी मंत्री पंकजा मुंडे यांची समयोचीत भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ सुमित लहाने यांनी केले.
कार्यक्रमास डॉ लहाने यांचे कुटुंबिय, त्यांचे सहकारी, चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
तात्याराव लहाने ह्यांचे वैद्यकीय क्षेत्रात कार्य मौलिक आहे.त्यांनी सुरू केलेल्या नेत्र रूग्णालयाच्या उद्घाटनाचा वृत्तांत निस्चितच वाचनीय आहे.
🌹डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांच्याबद्दल काय बोलाव??? 🌹
एक अनमोल रत्न
अशोक साबळे
Ex. Indian Navy
अंबरनाथ