बानो आणि त्या आणखी तीन मुलींना परत डोळ्यावर पट्टी बांधून वेगळ्या देशात की शहरात, गावात वस्तीत माहिती नाही कुठं घेऊन गेली ती लोकं. या मुलींना काहीच माहिती नव्हतं. फक्त अंधार होता आणि प्रवास सतत सुरू होता.
ती म्हणाली, खूप मोठ्या प्रवासानंतर त्यांना एका ठिकाणी थांबवलं गेलं. तिथे पण अशाच अंधार कोठडीत ठेवण्यात आलं. माहिती नाही किती दिवस प्रवास झाला होता. त्या दिवशी त्यांना ब्रेड आणि पाणी दिलं होतं. नंतर एका बाईने त्यांना अंघोळ घातली, त्यांना घालण्यासाठी विचित्र कपडे दिले आणि भडक मेकअप करून परत डोळ्यावर पट्टी बांधली.
बानो पुढे म्हणाली, “बडे अजीब से कपडे थे. कभी नहीं देखे थे हमने ऐसे कपडे. सारे पैर खुले थे, पीठ खुली थी और बहोत तंग से थे. इस बार एक नई बात हुई हमारे हात की नसो मे कोई सुई लगाई थी. उसके कूछ देर बाद सब कुछ धुंधलासा दिखाई देने लगा था. चक्कर भी आने लगे थे. उसी हालात मे हमे खींचकर ले जा रहे थे.
बानो ते सगळं जणू परत बघत होती, अनुभवत होती. माझे डोळे आणि मन भरून आलं होतं, हे सगळं ऐकताना. तिचे डोळे स्थिर झाले होते. डोळ्यातलं पाणी आटल्या नंतर फक्त दाह तेवढा उरला होता. लांब श्वास घेऊन ती म्हणाली, “न जाने किस जहन्नुम मे पोहोचाने के लिये ये सफर शुरू हो रहा था.
हम सब इतनी मासूम थी, जो अभी भी उस आदमी को चाचा बूला रही थी, जिसने हमारी बरबादी के सारे इंतजाम कर रखे थे. कोई हमे बेच रहा था, तो कोई खरीद रहा था. हम क्या हैं ? यही नहीं समझ पा रहे थे. सिर्फ जिस्म ? अभी कल तक तो सारे आदमी लोग हमारे चाचा, मामा, भैया, दादा, बाबा हूआ करते थे. आज उनकी ही उम्र के आदमी लोग हमे खरिद – बेच रहे थे. या अल्लाह ये कौंसा सफर शुरू हूआ हैं. ये समझ पाने से पहले सब जाया हो चुका था. फिर उम्र बढती गई और न जाने कितने देश, शहेर, गांव मे हमे बेचा गया.
एक दिन मेरी तबीयत बहोत बिघड गयी. खून की उल्टी होने लगी थी. फिर किसी अस्पताल मे भर्ती कराया गया मुझे. बेहोशी मे कितने दिन गुजरे पता नहीं. एक होश आया तो ….”
बानोचं बोलणं सुरु असताना एकाएकी जन्नत समोरून धावत येऊन म्हणाली,” …
क्रमशः

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
या कथेतून लेखिकेने एका सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवले आहे.