माध्यमकर्मी देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच नुकताच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकास भेट दिला.
हा संच त्यांनी स्मारकाचे कार्यवाह श्री राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह श्री स्वप्नील सावरकर यांच्या कडे सुपूर्द केला. यावेळी “कुटुंब रंगलंय काव्यात” फेम श्री विसुभाऊ बापट ही उपस्थित होते.
या संचात पुढील पुस्तके आहेत. विविध क्षेत्रातील व्यक्तीं वर लिहिलेले – “भावलेली व्यक्तिमत्वे“,
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकीक पत्रकारिता पैलूवर प्रकाश टाकणारे – “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” (मराठी व इंग्रजी),
थोर व्यक्तींच्या जीवन कार्यावर लिहिलेले – “अभिमानाची लेणी” हे ई -पुस्तक,
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालेल्या महिलांच्या प्रेरणादायी कथा असलेले – “गगनभरारी“,
युवा आणि पुरुषांच्या प्रेरणादायी कथा असलेले –
“प्रेरणेचे प्रवासी“, कासार समाजातील ३५ व्यक्तींच्या यशकथा असलेले “समाजभूषण”
शेकडो सरकारी अभ्यासक्रम, प्रशिक्षण यांची माहिती असलेले – “करिअरच्या नव्या दिशा” तसेच सौ अलका भुजबळ लिखित, कॅन्सरला न घाबरता त्यावर मात करायला प्रेरणा देणारे – “कॉमा” ही पुस्तके आहेत.
यातील “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” या पुस्तकाच्या लेखनासाठी स्मारकाच्या संदर्भ ग्रंथालयाची मोठीच मदत झाली. तर विशेष म्हणजे हे पुस्तक सावरकर यांच्या जयंतीदिनी, २८ मे २०१८ रोजी स्मारकात झालेल्या शानदार सोहळ्यात स्मारकाचे अध्यक्ष डॉ अरुण जोशी, कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर, तत्कालीन अतिरिक्त पोलिस महासंचालक (दहशतवाद विरोधी पथक) श्री अतुलचंद्र कुलकर्णी, प्रकाशक लता गुठे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आले होते.यावेळी स्मारकातर्फे प्रसिध्द करण्यात आलेले, “स्वातंत्र्यकवि गोविंद यांची कविता” हे पुस्तक श्री राजेंद्र वराडकर व श्री स्वप्नील सावरकर यांनी श्री भुजबळ यांना भेट दिले.
मूळ १९३० मध्ये प्रसिध्द झालेल्या या पुस्तकाची ही पाचवी आवृत्ती आहे. ऐतिहासिककदृष्ट्या अतिशय मूल्य असलेली ही आवृत्ती देखण्या स्वरूपात प्रकाशित करण्यात आली असून, ती प्रत्येकाच्या घरी असली पाहिजे, वाचल्या गेली पाहिजे, अशी आहे.
स्मारकाची कार्य तत्परता अशी की, पुस्तके प्राप्त झाल्याचे पोचपत्रही आम्ही निघायच्या आधीच, आम्हाला समक्ष देण्यात आले.
उपरोक्त संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्मारकाला मन:पूर्वक धन्यवाद श्री भुजबळ यांचा ☎️ 9869484800
ईमेल : devendrabhujbal4760@gmail.com
– टीम एनएसटी ☎️ 9869484800.