हुंडा प्रतिबंध कायद्याला यंदा ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने हुंडाविरोधी चळवळीने
“२१ व्या शतकातील हुंडा प्रथेचे वास्तव” या विषयावर राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या निबंध स्पर्धेचे पुरस्कार वितरण येत्या,
रविवार दिनांक २९ मे २०२२ रोजी सायंकाळी ०५ वा. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे कला मंदिर सभागृह, शहाजी राजे मार्ग, विलेपार्ले (पूर्व) मुंबई येथे होणार आहे.
याशिवाय संस्थेच्या संस्थापक सदस्य राधाबाई कुलकर्णी यांचे स्मरणार्थ गेली १३ वर्षे दिला जाणारा जिल्हास्तरीय विधायक कार्यकर्ती पुरस्कार यंदा
कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या राजश्री जम्बुकुमार साकळे यांना तर मागील सहा वर्षां पासून दिला जाणारा “शकुंतला परळकर सेवाव्रती डॉक्टर पुरस्कार” वर्षी विलेपार्ल्याचे सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ् डॉ. आशिष देशपांडे यांना देण्यात येणार आहे.
चळवळीचे प्रेरणास्थान आणि सानेगुरुजींचे विद्यार्थी दा. ब. तथा मामासाहेब कुलकर्णी यांचे स्मरणार्थ “साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार” दिला जातो, हा पुरस्कार या वर्षी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील प्रश्नचिन्ह शाळेचे संस्थापक शिक्षक श्री मतीन भोसले यांना जाहीर झाला आहे.
या सर्व पुरस्कारांचे स्वरूप मानधन रु.१०,०००/-, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, खादीसुताचा हार, शाल व श्रीफळ असे आहे.
यावेळी चळवळीच्या ४९ व्या वार्षिक अहवालाचे आणि मागील १० वर्षात आयोजित केलेल्या लघुकथा लेखन स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त लघुकथांच्या संग्रहाचे प्रकाशनही होणार आहे. तसेच “हुंडाविरोधी चळवळीची ५० वर्षे” या विषयावर मान्यवरांची मनोगते द्रुकश्राव्य माध्यमातून सादर करण्यात येतील.
पूर्व पिठीका
स्वातंत्र्य सैनिक मामासाहेब कुलकर्णी यांनी १ मे १९७३ रोजी हुंडाबंदी चळवळ सुरू केली.ही चळवळ यंदा पन्नाशीत पदार्पण करीत असून १ मे २०२२ पासून सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले.
अर्थात ही काही आनंदाची बाब किंवा उत्सव साजरा करावा अशी अजिबात नाही. खऱ्या अर्थाने या अनिष्ट प्रथेचा अंत कधी होईल ते काळच जाणे. पण या दुष्ट प्रथेच्या निर्मूलनासाठी चळवळ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
– टीम एनएसटी. 9869484800
सर्व पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन..!
हुंडा विरोधी चळवळीचे सर्वोसर्वा मामासाहेब कुलकर्णी यांचे या चळवळीचे कार्य मी स्वतः पाहिले आहे. गावोगावी, जागोजागी फिरुन ते स्वतः या बाबतची जनजागृती करीत असत. त्यांचे विचार आचरणात आणण्याजोगे आहेत. माझ्या विनंतीवरुन त्यांनी सोनोपंत दांडेकर कॉलेज, पालघर येथे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना लेक्चर दिले होते. त्यावेळी माझ्याघरी विश्रांतीसाठी थांबले होते. हे दौरे ते स्वखर्चाने करीत. एवढच नाही तर आपल्या संस्थेकडून दिनानाथ नाट्यमंदिरला शास्त्रीय संगिताचे कार्यक्रमांचे आयोजन असे. या सर्व कार्यक्रमाचे मला पासेस देत असत. ते आपल्या लेक्चरची सुरुवात ही आपल्या चित्रपट विभागाकडून तयार करण्यात आलेल्या “दहेज एक कलंक” आणि “दहेज” या दोन माहितीपटाने करीत. हे माहितीपट घेण्यासाठी ते स्वतः फिल्म सेंटरला दर दोन आठवड्यानी येत असत. त्यावेळेस मला जबरदस्तीने दोन रुपये देऊन जायचे. माझ्या कार्यात तुझा सहभाग आहे असे म्हणायचे. माझी मुलगी माझं कार्य अगदी नीट सांभाळतेय असे ते नेहमी म्हणायचे.
ही चळवळ अजूनही त्याच जोमाने कार्यरत असल्याचा आनंद आहे. पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा ..!
खुपचं सुंदर उपक्रम अशा पुरस्कांरांनी कौतूक तर होतेच
आणि कामाचा हूरूप आणखी वाढतो. इतकेंच नाही तर
इतरांना प्रेरणा ही मिळते .धन्यवाद। 🙏🙏🙏