बानो बोलायची थांबली. जन्नत भरलेला श्वास सोडत म्हणाली, “मेरे कागज क्यू लिये आपने ? ये मैने मेरे बाप को लिखा हैं आपको नहीं.” असं म्हणत तिने बानो च्या हातातील सगळे कागद हिस्कावून घेतले आणि तशीच पळत शाळेकडे परत निघून गेली. आम्ही दोघी तिच्याकडे बघत होतो. बानो माझ्याकडे बघून म्हणाली, “किस बाप को लीखा हैं ? जीसको मालुम भी नहीं है की उसकी कोई औलाद इस गंदगी मे पडी हैं. चलो यहा तो किसिका कोई नहीं होता लेकीन, मेरा बाप तो जनता था मुझे. मैं उसकी बच्ची हुं ये मालुम था उसको. फिर उसने क्या किया ?”
हा प्रश्न ती कोणाला विचारत होती माहिती नाही. पण त्यांचा इथे काय संबंध हे मला कळलं नव्हतं आणि बानो ला तर शाळेतील चाचा ने या विश्वात ढकललं होत. मग तिच्या वडिलांचा विषय का आला ? हे काय कोडं होतं माहिती नाही. मी बानो ला म्हणाले, “आपके बाबा को क्या पता आप यहा हो. आपके परिवार ने खोजा होगा ना आपको. “माझ्या कडे बघून बानो हसली आणि म्हणाली, “कितनी अंजान हैं आप इस दुनिया से. दिदी, इतना आसांन होता है क्या किसीको इस जहन्नुम मे ढकेल देना ? किसी एक का काम नहीं होता ये. बडी उल्लझने हैं. आप जानोगी तो सो नही पाओगी दिदी. मैं खुद आधी जिंदगी गुजरने के बाद समझी हुं. पुरी कहानी मे कई किरदार हैं जो इस दुनिया को चला रहे हैं.
माझ्या मनातील प्रश्न आणि गोंधळ दोन्ही वाढत होते. पण नको ते प्रश्न विचारून मला तिला त्रास द्यायचा नव्हता. ती सांगेल तेवढंच ऐकायचं होतं आणि हा गुंता पण ती कधीतरी मोकळा करणार हे मला माहिती होतं. मी बानोला म्हणाले, “अंजान तो हुं इस दुनिया से लेकीन किस तकलीफ से आप गुजरी होगी ये समझ रही हुं.” असं म्हणताना मी तिच्या हातावर आपला हात ठेवला. मी हात ठेवताच बानो लहान बाळासारखी रडू लागली. मी काही बोलणार त्या आधीच बानो ने माझा हात आपल्या कपाळावर ठेवला आणि म्हणाली, “इतने पाक तरीके से तो बस अम्मी ने छुआ था. जमाना बिता उसको भी. “मी काहीच बोलले नाही. तिच्याकडे बघत होते फक्त.
बानो ने खांद्यावरची ओढणी सावरली आणि आपला हात चेहऱ्यावर फिरवून घेतला. ओले डोळे पुसून घेतले जणू परत ओले होण्यासाठी त्यांची तयारी करून देत होती ती आणि पुढे म्हणाली, “दिदी अस्पताल से फिर एक नई दास्तान शुरु हुई. न जाने कितने इमतेहान बाकी है अभी. जब होश आये तो कोई नहीं था मेरे पास. लेकीन कमजोरी बहोत ज्यादा थी. कूछ दिखाई नहीं दे रहा था ठिक से. पलंग को पकडकर खडे होने की कोशिश की. मन में आया यही मौका था भाग जाने का. इस खयाल के आते ही मैं बाहर जाने का रास्ता देखने लगी. जो दरवाजा दिखा खोलने लगी. बाहर का रास्ता तो मिल गया लेकिन…
क्रमशः

– लेखन : डॉ राणी खेडीकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
राणी खेडेकर यांची लालबत्ती कथा अतिशय चटके देणारी आहे.
काही दिवसापूर्वीच गंगुबाई काठियावाडी मुव्ही पाहिला.
लालबत्तीतील बानुच पाहिल्यासारखे वाटले…