Wednesday, September 17, 2025
Homeपर्यटननिसर्गरम्य केरळ

निसर्गरम्य केरळ

नमस्कार, वाचक हो.
शांत, सुंदर असा Kochi fort beach हा स्थानिक आणि पर्यटक सर्वांनाच फार प्रिय आहे. इथला सागरी किनारा आणि किल्ला ( Beach & Fort ) दोन्ही गोष्टी आकर्षक आहेत. यूरोपियन वास्तुकलेचा अप्रतिम नमुना म्हणजे हा किल्ला. पाण्यातील रोमांचक खेळ इथे खेळता येतात त्याबरोबरच बोटीतून फेरफटकाही मारता येतो.

कोचीन विमानतळापासून काही अंतरावर चेराई – Cherai beach येतो. या स्वच्छ सागरी किनाऱ्यास खूप लोक भेट देतात. इथे पोहण्याचा आनंदही घेता येतो. आणि नंतर किनाऱ्यावरील आहाराचा आस्वाद घेऊन छान पैकी पोटोबा करून तृप्त होता येते.

इथे अजून एक आकर्षक गोष्ट म्हणजे चिनी मासेमारीचे जाळे. Chinese fishing nets हे पाहणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. जग प्रसिद्ध असणाऱ्या back water म्हणजेच आलपूळा इथे प्रसन्न करणारा शांत, स्वच्छ आणि लांब असणारा मरारी – Marari beach आहे. पहाटे आणि संध्याकाळी इथे येवून चालणे मन प्रफुल्लित होते.

बाजूला असणारे खाद्य पदार्थांची छोटी हॉटेल्स चहा, कॉफी, स्थानिक नाष्ट्याचे पदार्थ दिल खुश करतात.
हाऊस बोट मधील रोमांचक सफर करून झाल्यावर या किनाऱ्यावर आल्यावर सहलीचा आनंद द्विगुणित होतो. केरळची राजधानी असलेले त्रिवेंद्रमला तर अतुलनीय सागरी किनारे लाभले आहेत.

इथला कोवलम सागरी किनारा Kovalam beach हा पर्यटकांना अति प्रिय आहे. आराम करणे, पाण्यात पोहणे या गोष्टींचा पर्यटक आनंद तर घेतातच पण पारंपरिक आयुर्वेदिक मसाजही आवडीने करून घेतात. आजूबाजूला असलेल्या हॉटेल्स मधून पारंपरिक केरळचे पदार्थांपासून ते इतरही आवडीचे पदार्थ पर्यटकांना मिळू शकतात.

Light house beach हा किनारा लक्ष वेधून घेतो तो इथे असणाऱ्या light house ने. लाल आणि सफेद रंगात रंगलेले हे light house आजूबाजूला असणाऱ्या विस्तीर्ण सागरातून खुणावत असतो.
इथून जवळच असणारा Poovar beach हा अतुलनीय सागरी किनारा आहे. निळेशार पाणी, सोनेरी वाळू आणि तोऱ्यात डुलणारे नारळाची झाडे जणू स्वर्गाचाच भास देतात. इथे पर्यटक बोट मधून सफारीही करू शकतात.

त्रिवेंद्रमपासून काही अंतरावर असणारा Varkala beach हा कायम लक्षात राहणारा हा सागरी किनारा. याला पापनाशम – Papanasham beach असेही म्हणतात. असे म्हणतात की इथल्या नैसर्गिक झऱ्यांमध्ये औषधीय गुण आहेत. आणि कदाचित या मान्यतेमुळेच Papanasham beach असेही नाव पडले असेल.

तोच समुद्र..तेच पाणी.. असे असले तरीही प्रत्येक सागरी किनारा रोमांचित करतो, नवीन अनभूती देतो. प्रत्येक किनाऱ्यावरील प्रत्येक क्षण अविस्मरणीय करतो.

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटी. पालकाड, केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. निसर्गरम्य केरळचे विहंगम वर्णन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं