Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यजीवन प्रवास

जीवन प्रवास

(मुक्तछंद)

दूरवर चालत आलेय आता..
पण..आजही, मागे वळून पाहताना
दिसतात त्या पाऊलखुणा अनेक
प्रत्येक पावलावर संघर्ष अस्तित्वासाठी

शिक्षणाची अनावर ओढ, अन् पोटतिडकीने केलेली आर्जवे..
कधी पापणीआड दडवलेली स्वप्ने..कधी
कित्तेक त्या रात्री अश्रूंनी भिजलेल्या

गरज फक्त पोटालाच नसते हे मौनानी सांगू पाहणाऱ्या..
दिसतात तेही क्षण, काही आनंदाचे..
दवात भिजल्या कळीसारखे, उमलत जाताना पाकळी पाकळीवर ओला गंध घेऊन डोलणारे..

आस जागवणारे
सुख दुःख, आशानिराशेची वादळे थोपावत,
पावलापावलावर उमटलाय तो,
शब्दांनी बांधलेला, नात्यांना विश्वासाने सांधलेला अन्,
मनापासून जगणं मानलेला
इथवर केलेला प्रवास…

मागे वळून पाहताना.. तृप्तीचे, स्वानंदाचे अलौकिक तेज चेहऱ्यावर विलसणारा,
कधी परिपूर्ण ..तर कधी अपूर्ण.. तरीही सुखावणारा
काहीतरी राहून गेलं तरीही, खूप काहीतरी मिळालंय म्हणून रडता रडता हसवणारा…
जीवन प्रवास……

भाग्यश्री खुटाळे

– रचना : भाग्यश्री खुटाळे. फलटण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अडथळ्यांची तमा न बाळगता केलेल्या जीवनप्रवासाचे सुंदर वर्णन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं