नुकताच मी जवळपास १५ दिवस अष्टांग योग व निसर्गोपचार आश्रमात राहून आलो. मी अनुभवलेल्या गोष्टींवरच, दुसरे आश्रमवासी श्री अजित पाठक यांनी त्यांच्या मित्रांसाठी पाठविलेला मजकूर प्रातिनिधिक असल्याने तो येथे देत आहे.
देवेंद्र भुजबळ, संपादक
मित्रांनो….
एक अनुभव शेअर करत आहे…. मागील दहा दिवस मी बदलापूर जवळील अष्टांग योग व निसर्गोपचार आश्रमात इलाज करत होतो.
मला असे काही फार दुखणे नव्हते पण सायटीका चा त्रास होता. ज्यामुळे मला कंबरेत तसेच पायात, घुटण्यात ही त्रास होता. आणि आपली दारू ज्यामुळे कॉलोस्टॉल ही वाढले होते. दोन मजले चढलो तरी धाप लागत होती.
मी इथे दहा दिवस मुक्कामी होतो. येथील दहा दिवसाच्या मुक्कामात दररोज सकाळी 5:30 ते संध्याकाळी 7 वाजे पर्यंत अशी दिनचर्या होती. ज्यामध्ये सकाळी योगाभ्यास नंतर दररोज डॉक्टर ची भेट ज्यामध्ये दररोजची ट्रीटमेंट दिल्या जात असे. ज्यामध्ये योग, वेगवेगळे मसाज, फिजीयो थेरपी, व्यायाम आणि सर्वात महत्वाचे सात्विक शुद्ध व तेवढ्याच आपुलकीने केलेला स्वयंपाक, चविष्ट असे जुसेस, सूप आणि भरपूर फळे आणि दिवसभर चालणारी सुमधुर जुनी गाणी, ज्याची एक वेगळीच मजा आहे ज्यांचा परिणाम म्हणजे माझे वजन 5 किलो ने कमी झाले.
पहिल्या दिवशी असलेले BP जे 160/100 होते ते चारच दिवसात नॉर्मल 120/80 झाले आणि तसेच आज पर्यंत आहे. सायटीका चा त्रास 90% बरा झाला आहे. येथील सर्वेसर्वा एक हसतमुख प्रेमळ व्यक्तीमत्व डॉ. रमनाणी व त्यांना मदत करणाऱ्या दोन गोड डॉ. मुली, दर्शना व आकांक्षा यांच्या बरोबर येथील सर्व थेरपिस्ट सहकारी पण मनमिळाऊ, मितभाषी आणि तुमच्या दुखण्याला व शरीराला मानवेल असा व्यायाम आणि मसाज करणारे.
सर्वच गुणी त्यामुळे कोणाचे नाव घेत नाही. डॉ. चैतन्य आणि त्यांचा फीजीयो स्टाफ पण तसाच. या मध्ये सर्वात भावलेल्या म्हणजे येथील स्वयंपाक घरातील सर्व ताई. ज्यांनी मनापासून व निरपेक्ष भावनेने, प्रेमाने केलेला स्वयंपाक यांचा पण तितकाच प्रभाव, गुण आहे ज्यामुळे येथील उपचार लवकर लागू पडतात. मी या सर्वाचा आभारी आहे.
ज्यांच्या मुळे मला येथील माहिती मिळाली त्या श्रीमती आशाताई देवळे यांची ओळख म्हणजे या आमचे घनिष्ठ मित्र हितचिंतक श्री अतुल पद्माकर देशपांडे यांच्या सासु बाई आहेत. यांचे मी येथे मनःपूर्वक आभार मानतो.
आज उत्साहाने आणि आनंदाने येथून आयुष्याच्या प्रवासाला जात आहे. दहा दिवसाच्या या छोट्याशा परिवारात काही चांगले गुणी सहप्रवासी भेटले, ज्यामधे श्री देवेंद्र भुजबळ साहेब, गवळी काका सोबत चांगली मैत्री झाली. बबिता ताई, आसावरी मॅडम, श्री आणि सौ ठाकूर, तसेच रामअवतारजी, नरेश बजाजजी या सर्वांचे पण खूप प्रेम मिळाले ज्यामुळे हा प्रवास खूप सुखकर आणि आनंदी झाला. सर्वांना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देऊन येथेच थांबतो.
– लेखन : अजित पाठक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800