Friday, November 22, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्रा.विसुभाऊ बापट यांनी लिहिलेल्या “माहिती”तील आठवणी” मध्ये ज्या श्री प्र स महाजन साहेब यांच्या विषयी लिहिले होते, त्या लेखात महाजन साहेब यांचे छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध नसल्याने ते देता आले नव्हते. आपले जेष्ठ लेखक, वाचक व सेवानिवृत्त माहिती उपसंचालक श्री सुधाकर धारव साहेब यांनी त्यांच्या संग्रहातून ते छायाचित्र पाठविले आहे. ते पुढे देत आहे. श्री धारव साहेबांचे मन:पूर्वक आभार.

श्री प्र स महाजन

वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
🙏🙏नमस्कार
सर्व सदरे सुंदर आहेत. स्वामी विवेकानंदांच्या आठवणींना खुप छान उजाळा दिला गेला. विवेकानन्दाचे विचार नेहमीचं वाचनीय आहेत त्यांची धर्म संकल्पना आता लोकांनी आचरनात आणायला हवी. बदलापूरचे झाले कवितापुर, विसूभाऊ असल्यावर हे होणारच छान कार्यक्रम, भावलेली गाणी, प्यार हूवा ….. सचित्र खुप सुंदर निर्सग, माझा सखा कविताही छान आहे 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
– आशा दळवी. फलटण, सातारा

यशवंत पगारे यांची जीवनाची कविता फारच आवडली. पानांकडून हिरवं व्हायला शिकतो,
फांद्यांकडून आधार द्यायला शिकतो.
कविता होतो
कविता जगतो…
साधेच शब्द पण अतिशय रसाळ…
– राधिका भांडारकर. पुणे

रझ्झाक शेख, शिक्षक आणि मराठी कविताकार यांची कविता किशोर या बालकप्रिय मासिकात प्रसिद्ध झाल्याबद्दल अभिनंदन….. 🌹🙏
– सुधाकर धारव. यवतमाळ

अलका अतिशय सुंदर शैलीत लिहिले आहेस, परत एकदा वाचायची इच्छा झाली, अरुण दाते महाराष्ट्राचे लाडके🙏🏻
– वर्षा फाटक, पुणे

रायमा लेख अतिशय सुरेख, सुरेल, प्रेरणादायक ! छोटा पॅकेज बडा धमाका.
– प्रिया मोडक. ठाणे

सर्वच लेखन वाचनीय…. अप्रतिम… 👍🏻👍🏻👌
लालबत्ती भावस्पर्शी 👌👌👌
– अनिता व्यवहारे. श्रीरामपूर

रायमा….
खरोखर उद्बोधक लेख आहे….
खूप शिकण्यासारखे आहे..
या कुटुंबाकडून.
– वासंती पाठक. नाशिक

जादुगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग मी नागपूर ला धनवटे रंग मंदिरात पाहिले आहेत.
आता उरल्या केवळ आठवणी…
अद्भुत आणि अविस्मरणीय.
धन्यवाद.💕
– सुधाकर धारव. यवतमाळ

आजची अति उत्कृष्ट “रायमाची” न्यूज़ स्टोरी आहे 👍👍🙏🙏
– प्रा डॉ तुकाराम गायके. औरंगाबाद

“वीर सावरकरांची समुद्र उडी” या आपले परदेशस्थ लेखक, मोरोक्को चे श्री प्रकाश फासाटे यांच्या समयोचीत लेखाला काही मिळालेल्या काही सविस्तर प्रतिक्रिया पुढे देत आहे.

जयोस्तुते•••🚩
धन्यवाद 🙏 प्रकाश फासाटे सर.
धन्यवाद 🙏 देवेंद्र सर.. इत्यंभूत माहिती न्यूज स्टोरी मार्फत प्रकाशित केल्या बद्दल !_
– संजीव दिघे

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा अलौकीक, महापुरूष पुन्हा बघायला मिळणार नाही. मानाचा मुजरा.
– विलास प्रधान. मुंबई.

प्रकाश फासाटे यांचा, वीर सावरकरांची महासागरातील ऐतिहासिक उडी हा लेख अतिशय आवडला. सावरकरांनी धैर्य, साहसीपणाचा इतिहास घडवला.
देशभक्ती म्हणजेच सावरकर हे समीकरण अजरामर झाले. आज हा लेख वाचताना पुन्हा एकदा तो क्रांतीचा काळ उभा राहिला. अशी माणसे, असे नेते होणे नाही. काळाचं हे दगडी पान फक्त इतिहासाची साक्ष देतं. अप्रतिम लेख !!
– राधिका भांडारकर. पुणे

समृध्दी निघाली ब्राझील ला…या स्टोरी विषयी, तिचे अभिनंदन करणाऱ्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

छान आहे अंक. समृद्धीचे चयन झाल्याबद्दल.. आणि… मेघना ताईंच्या पुस्तकासाठी अभिनंदन.
किशोरकुमार अफलातून राग सुरभी व चारोळ्या …चांगले.
– स्वाती वर्तक. मुंबई

समृध्दीचं अभिनंदन आणि ब्राझील वारीला शुभेच्छा.🥳🥳👏👏🍫🍬🍭
– दशरथ पाटील. नगर

समृद्धी बद्दल लिहिलेला लेख छान आहे.
सर्व चारोळ्या वाचल्या सुंदर आहेत.
– आसावरी घोलप. बदलापूर

समृध्दी तुझे खुप खुप खुप खुप खुप
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!
सौ.अनुराधा हेमंत जोगदेव
यांच्या चारोळ्या आशयघन
अप्रतिम अप्रतिम अप्रतिमच !!!
– डॉ मधुसूदन घाणेकर. पुणे

What City in Brazil is She Going ??
My Daughter also had Gone to USA after her 10th. It is Great Experience.
– Captain Abhyankar. Pune.

“चित्रसफर” मधील “ग्रेट किशोरदा” या लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

संदिप सर तुमचा लेखन स्वभावगुण पाहता, किशोर कुमार हा भाग खुप मोठा असेल असे वाटले होते. पण असो. थोडक्यात चांगली माहिती दिली🙏🏻
– श्री विजू रोहकले. मुक्तांगण मित्र, अहमदनगर

उत्तम संकलन व लेखन. स्तुत्य उपक्रम. हार्दिक शुभेच्छा 👌👌👌🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
– श्री कासार साहेब. सेवानिवृत्त अधिकारी श्रीरामपूर

अभ्यासपूर्ण व खूप छान लेखन….
– श्री अविनाश ठाकूर. मुक्तांगण मित्र राहुरी

किशोरदा बाबत जितकं तू सांगू व लिहू शकतो, तितकं कदाचित कोणी लिहू शकणार नाही. कारण तू गाण्यातून किशोरदांना जगतो आहेस, हे तूला मिळालेलं गॉड गिफ्टआहे.
किशोरदा यांचेबाबत तू केलेलं लिखान व माहिती अप्रतिम आहे.💐🙏🏻
– श्री शाम हिंगे.
अधीक्षक जलसंपदा विभाग, औरंगाबाद

खूपच छान माहिती रायमा बद्दल मिळाली. रायमा आणि तिच्या आई बाबांचे पण अभिनंदन रायमाच्या भावी आयुष्या साठी खूप शुभेच्छा 🙏🏻
विलास कुडके यांचा जादूगार रघुवीर यांच्यावरील लेख मनाला खूप भावला. जादू ही कला आहे असं सांगणारे ते एकमेव सत्यवादी जादूगार होते. आता त्यांची पुढची पिढीही काम करीत आहे.मला स्वतःला जादू पाहायला खूप आवडते. खरचं शासनाने या कलेला प्रोत्साहन पुरस्कार द्यायला हवेत.
लालबत्ती राणी खेडीकर यांची क्रमशः कहाणी मन सुन्न करून जाते.
माधवी ढवळे यांची पाऊस सरी कविता सुंदर आहे
वीर सावरकर यांच्या ऐतिहासिक समुद्र उडी वरील लेख अप्रतिम खूप सुंदर वर्णन अंगावर रोमांच उभे राहिले. सावरकरांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद प्रकाश फासाटे सर🙏🏻
अत्युच्च प्रतिभा संपन्न बा.भ.बोरकर यांच्यावरील प्रकाश क्षीरसागर यांचा लेख खूप छान वाटला. बा.भ. यांच्या निसर्गाच्या रम्य कविता मलाही खूप आवडतात. त्यांच्या पुण्यतथीबद्दल त्यांना आदरांजली🙏🏻💐
सुमती पवार यांची वेड्या स्त्रिया कविता स्त्रीच्या अफाट शक्तीची जाणीव करून देते. अतिशय सुंदर कविता.👌🏻👌🏻 ग्रेट 🙏🏻
समृद्धीची यशोगाथा छानच, भुजबळ सरांनी आमच्या पर्यंत पोहोचवली. समृद्धी चे खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा.
मराठी साता समुद्रापार मेघना साने यांचे पुस्तक नक्कीच प्रशंसनीय आहे. मराठी शाळा बंद होत असताना परदेशात मराठी नागरिक मराठी रुजवण्यासाठी धडपड करीत आहेत. हे सांगणारे पुस्तक मेघना ताईंनी लिहिले. खूप अभिनंदन ताई🙏🏻💐
प्रत्येकाला वेगळा आवाज वापरणाऱ्या अवलिया किशोर कुमार वरील लेख उत्तम संदीप भुजबळ यांची चीत्रासफर मस्तच👍
प्रिया मोडक यांचा राग बिहागडा वरील माहिती पूर्ण लेख खूप छान. मला रागातील काही कळत नाही पण माहिती वाचायला आवडते. खूप छान प्रिया अभिनंदन👍
अनुराधा जोगदेव यांच्या चारोळ्या खूप सुंदर मी परत परत वाचल्या.
गुणकारी अष्टांग योगवरील माहिती खूप छान वाटली. आम्हाला पण बदलापूरला जायचा योग जुळून येऊ दे.
धन्यवाद अजित पाठकजी 🙏🏻

वाढत्या लोकसंख्ये वरील दिलीप गडकरी यांचा माहितीपूर्ण लेख 👍
2030 पर्यंत जागतिक लोकसंख्या 887 कोटी पर्यंत पोहोचणार आहे. बापरे या मध्ये भारताचा वाटा मोठा असणार आहे.😀
खूप छान माहिती धन्यवाद गडकरी साहेब🙏🏻
अर्चना मायदेव यांची विठ्ठला वरील क्षणिक विसावा कविता खूप छान.
धन्यवाद टीम एन एस टी, भुजबळ सर आणि अलका ताई भुजबळ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
– सुप्रिया सावंत. नवी मुंबई

मेघना साने ह्यांचं मराठी सातासमुद्रापार पुस्तकाचं वर्णन ऐकून फार आनंद झाला. आपल्या देशाचं भाषेचं प्रेम सर्वांनी जपावं असं मनात असतं. ते ह्यांनी प्रत्यक्षात आणलं ह्याच कौतुक वाटत आहे. त्यांना प्रकाशनाच्या शुभेच्छा..
– सुनंदा पानसे. पुणे

याशिवाय १५ ते २० वाचकांनी ही स्टोरी लाईक केली आहे.

जादूगार रघुवीर यावरील अभिप्राय पुढे देत आहे.

Dear Vilasji in this article u very well tried to rejuvenate the wonderful art of magic. In our childhood this art was in predominance n magician’s show was a great attraction for the children as well as to the elderly. It is an art of tricks n we were very eager to see those tricks of magician. Magician while performing used appear n disappear during the show.He used to swallow notes n again coughing out those notes in big roll n such several other tricks he used show on the stage as mentioned in the article. Now a days these shows have become scarce though u have nicely present the magician’s picture in reality in ur article. Compliments for that. Our honorable editor has by this article served to us with one more delicious dish at his portal for this he deserves appreciation.🌹
– Shri Ranjitsinh Chandel, Yavatmal

लहानपणी आम्ही देखील जादूचे प्रयोग पाहून अचंबित होत असू. निखळ हात चालाखीचे सर्वोत्तम सादरीकरण असते. छान लेख
– श्री भिक्कू महेंद्र कौसल, माजी संचालक (माहिती).

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments