हँडसम विनोद खन्ना
एक ऐसा अभिनेता जिसने व्हिलन बनने से की शुरुवात । और ऊसे मिला हॅन्डसम हिरो का किताब । ओ था रिअल माँचो मॅन, देश का सबसे खूबसुरत हिरो। जिसकी एन्ट्री पर बजती थी तालिया। करिअर के पीक पॉईंट पर छोड दी फिल्मो की गलिया। He is Non Other Than Vinod Khanna.
6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावर, पाकिस्तान येथील पंजाबी परिवारात विनोदचा जन्म झाला.
विनोद 10 वर्षांचा असताना, 1957 मध्ये सर्व कुटुंब दिल्लीत आले. तिथे 3 वर्ष राहिल्यावर मुंबईत स्थायिक झाले.
विनोद 14 वर्षांचा असताना त्याला बोर्डिंग स्कूल मध्ये दाखल करण्यात आले. आणि विनोद तिथे शिकू लागला.
विनोद लहानपणापासूनच दिसायला सुंदर होता. पण लाजाळू स्वभाव असल्याने टीचरने एका नाटकात भाग घ्यायला लावला. याचा परिणाम असा झाला की,
विनोदचा लाजाळू स्वभाव दूर झाला आणि अभिनयात त्याला गोडी वाटायला लागली.
विनोद शाळेत असताना त्याने देव आनंदचा सोलवा साल आणि दिलीपकुमारचा मोगले आजम हे चित्रपट पाहिले. या 2 चित्रपटांचा विनोद वर खूप परिणाम झाला आणि आपण अभिनेता बनायचे हे त्याने ठरवले. नंतर विनोद ने कॉमर्स चे पदवी शिक्षण पण पूर्ण केले. कॉलेजमध्ये मुली त्याला म्हणत, “विनोद तू खूप सुंदर दिसतो, फिल्म मध्ये का नाही जात ? मित्र पण म्हणायचे, तू हिरो सारखा दिसतो.
एका पार्टीत विनोद ला पाहून सुनील दत्त ने विचारले,
क्या तुम मेरे फिल्म मे काम करोगे ? विनोद च्या आनंदाचा ठिकाणा राहिला नाही. पण त्याचे वडील परवानगी देत नव्हते. ते म्हणाले, जर तू २ वर्षात फिल्म लाईन मध्ये सेट झाला तरच कर. नाहीतर फिल्म लाईन सोडून परत यायचे. विनोद पण जिद्दी होता.
सुरुवातीला सुनीलदत्त मुळे त्याला 1968 मध्ये “मन का मीत” मध्ये संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. फिल्म फार चालली नाही पण विनोद खन्ना सर्वांच्या नजरेत आला. त्याची खलनायकाची भूमिका लक्ष वेधून गेली.
या फिल्म नंतर विनोदने 15 फिल्म्स साइन केल्या. सर्वच फिल्म्स मध्ये त्याला हिरो किंवा खलनायक असे रोल मिळाले होते.
आपल्या आवडत्या सुपरस्टार राजेश खन्ना समवेत त्याला 1969 साली “सच्चा झुठा” त संधी मिळाली. यात त्याचा पोलिस ऑफिसर चा रोल लक्ष वेधून गेला.
याच धर्तीवर पुन्हा 1970 साली आलेल्या “आन मिलो सजना” निगेटिव्ह शेडचा रोल पण त्याने जबरदस्त केला. त्या दोन्ही फिल्म्स सुपरहिट झाल्या.
1971 चा डाकू पट “मेरा गाव मेरा देश” हा तुफान गाजला. यातील त्याचा डाकूचा रोल भाव खाऊन गेला. सुंदर आणि रुबाबदार डाकू, असाच विनोद खन्ना चा पेहराव होता. ही मॅन धर्मेंद्र पुढे तो कुठेही कमी पडला नाही. ही फिल्म पण सुपरहिट झाली.
1971 चीच “रेश्मा और शेरा” पण हिट झाली. याच वर्षी त्याने आपली मैत्रीण गीतांजली बरोबर विवाह केला.
गीतकार गुलजार हे “मेरे अपने” मधून डायरेक्षन मध्ये उतरले. यात विनोद त्यांना परफेक्ट नायक वाटला. त्याने एक बेरोजगार युवक साकारला. सोबत मीना कुमारी होती. यातील किशोर कुमार ने गायलेले “कोई होता जिसको हम अपना कह लेते यारो पास नही तो दूर ही होता लेकीन कोई मेरा अपना” हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. त्यावेळी मीनाकुमारी म्हणाल्या, विनोदचा अभिनय खूप बोलका आहे. तो खूप मोठा होईल. आणि त्याप्रमाणेच झाले.
1971 ते 1975 या कालावधीत जमीर, कच्चे धागे, अनोखी अदा, प्रेम कहाणी, सौदा सेवक आणि हाथ की सफाई यातील रोल साठी विनोद ला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचे अवॉर्ड मिळाले.
1975 मध्ये गुलजार ने “अचानक” मध्ये विनोद ला पुन्हा संधी दिली. त्याने फौझीचा रोल केला. 1976 ला ‘हेराफेरी’ त प्रथमच अमिताभ बरोबर त्याने काम केले.
त्यानंतर ‘परवरिश’ 1977 आला. विनोद खन्ना डायरेक्टरची पहिली पसंती होत चालला होता. 1977 ला ‘अमर अकबर अँथनी’ आला. यात अमिताभच्या मोठ्या भावाचा, अमरचा रोल त्याने केला. प्रत्यक्षात विनोद अमिताभ पेक्षा 4 वर्षांनी लहान होता.
1978 ला “मुकद्दर का सिकंदर” ने सर्व रेकॉर्ड मोडले आणि विनोद खन्ना ला लोक नंबर 1 मानायला लागले.
त्यातच 1980 साल उजाडले. फिरोज खान कुर्बानी साठी अमिताभ ला घेणार होते पण त्याने नकार दिल्याने फिरोज खान ने विनोदखन्ना ला घेतले आणि इतिहास झाला. 1980 सालची ही नंबर 1 ची फिल्म बनली आणि हे दोघे जिगरी मित्र बनले.
विनोद एवढा मोठा स्टार होऊनही पण अध्यात्माकडे त्याचा विशेष कल होता. ओशो रजनीश कडे संन्यास घेण्याचे त्याने ठरवले. या बाबतीत विनोदने सांगितले, माझ्या आईचा मृत्यू झाला पण लोक मला बघायला आले. त्याने माझे मन अस्वस्थ झाले. तो 1981 मध्ये नंबर 1 होता. असे असतानाही सर्व फिल्म्स पूर्ण करून त्याने संन्यास घेतला. नंतर तो अमेरिकेत गेला. तिथे माळ्याचे काम करू लागला. पत्नीला डिवोर्स दिला. परंतु काही कालावधीतच आश्रम भारतात येण्यासाठी दबाव येऊ लागला. यामुळे विनोद खन्ना अस्वस्थ झाला आणि त्याने पुन्हा फिल्म दुनियेत येण्याचा निर्णय घेतला. पण 5 वर्षात खूपकाही बदलले होते. परंतु लोक विनोद खन्ना ला विसरले नव्हते. 1987 ला ‘सत्यमेव जयते’ आणि ‘इंसाफ’ या 2 चित्रपटाद्वारे त्याने दमदार पुनरागमन केले.
1988 मध्ये फिरोज खान ने ‘दयावान’ ची निर्मिती केली. जबरदस्त ॲक्टिंग काय असते, हे त्याने दाखवून दिले. त्यानंतर ‘बटवारा’, धर्मेंद्र डिंपल समवेत ‘आखरी अदालत’, ‘फरिशते’, ‘सी आय डी’, ‘चांदणी’ असे चित्रपट त्याने केले. यातील ऋषी कपूर आणि श्रीदेवी समवेतचा “चांदणी” सुपरहिट झाला. बाकीचे सरासरी चालले.
1990 ला महेश भट ची फिल्म ‘जुर्म’ मधील पोलिस ऑफिसर आणि त्यातील “जब कोई बात बिघड जाये तुम देना साथ मेरा ओ हमनावा” हे गाणे कुमार सानू चा आवाज आणि विनोद ची ॲक्टिंग यामुळे स्मरणात राहते.
1990 ला विनोद खन्ना ने त्याच्या पेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या कविताशी दुसरा विवाह केला. परंतू आपल्या पहिल्या पत्नीचा मुलगा अक्षय खन्ना साठी त्याने 1997 ला “हिमालय पुत्र” बनवला पण त्याच्यासारखे यश, अक्षय ला मिळाले नाही. तरी पण अक्षय आणि राहुल साठी त्याने प्रयत्न केले.
1997 पासून राजकारण आणि फिल्म्स याचा विनोद खन्ना ने चांगला समतोल साधला.
श्री अटलबिहारी वाजपेयी यांना आदर्श मानणारा विनोद खासदार झाला आणि पुढे मंत्रीही झाला.
चरित्र अभिनेता म्हणून पण विनोद ने दमदार भूमिका केल्या. ज्यात क्रांती, रिस्क होत्या.
सलमान खान विनोद खन्ना ला खूप लकी मानायचा. वॉन्टेड 2009 आणि दबंग 1 an 2, सन 2010 ज्यात सलमानच्या वडिलांची केलेली त्याची भूमिका सुपरहिट झाली.
2013 ला राम्या वस्तावया, 2015 चा ‘दिलवाले’ मध्ये विनोदने शाहरूख सोबत काम केले. ‘एक थी राणी ऐसी भी’, 2017 ही त्याची शेवटची फिल्म ठरली.
त्यानंतर काही काळाने विनोद खन्ना चा 1 फोटो व्हायरल झाला, तेव्हा कोणालाही खरे वाटले नाही की, हाच का तो हँडसम विनोद खन्ना आहे, ज्याला ब्लड कॅन्सर पूर्ण ग्रासले होते. शेवटी यातच 27 एप्रिल 2017 रोजी 71 व्या वर्षी हा स्टार सर्वाना सोडून गेला. मुकद्दर का सिकंदर यात ‘जिंदगी तो बेवफा है’, ‘एक दिन ठुकरायेगी मौत मेहबूबा है’, ‘अपने साथ ले कर जायेगी’, ‘मर के जिने के बहाणे दुनिया को सीखलायेगा’, ‘ओ मुक्कदर का सिकंदर जानेमन कहलायेगा……’

– लेखन : संदिप भुजबळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
श्री विनोद खन्ना यांचा जीवनपट आपण खूप सुंदर प्रकारे लिहिला आहे. काही नवीन गोष्टी माहित झाल्या.
धन्यवाद सर
New information