नमस्कार, मंडळी.
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ६१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईत ‘नवं कोरं‘ हा कवितांचा बहारदार कार्यक्रम झाला.
कवयित्री तथा अभिनेत्री स्पृहा जोशी, कविपुत्र सर्वश्री संकेत म्हात्रे, आदित्य दवणेे, प्रथमेश पाठक या तरुण कवींनी स्वतःच्या कवितांबरोबर काही स्मरणीय कविता सादर केल्या.
विशेष म्हणजे या कवितेच्या कार्यक्रमास रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. सभागृह तुडुंब भरले होते. काही उपस्थित मान्यवरांसोबत माझाही ह्रद सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मी स्पृहा जोशी यांना अशी विनंती केली की, त्यांनी त्यांच्या या अभिनव कार्यक्रमात, तेराव्या शतकात होऊन गेलेल्या, महानुभाव पंथाच्या उपासक, मराठीतील पहिल्या कवियत्री महदंबा यांच्या विषयी माहिती सांगून त्यांचा ढवळे हा काव्य प्रकार रसिकांसमोर अवश्य सादर करावा.
त्यांनी माझे म्हणणे पूर्ण ऐकून घेतले. आशा आहे की, त्या आणि त्यांची टीम या सूचनेचा नक्कीच विचार करेल.
एका छान कार्यक्रमाला अगत्याने बोलाविल्याबद्दल,
शिवाय माझा सन्मानही केल्याबद्दल टीम महाराष्ट्र टाइम्सचे आणि विशेषत: नवी मुंबई प्रतिनिधी श्री मनोज जालनावाला यांचे मन:पूर्वक आभार.
या नव्या कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा.
ठिकठिकाणच्या साहित्यप्रेमी मंडळींनी आणि मंडळांनी त्यांच्या त्यांच्या गावी या कार्यक्रमाचे अवश्य प्रयोग ठेवावेत आणि समाजातील साहित्यप्रेम, रसिकता वर्धिष्णू करावी, ही कळकळीची विनंती.

– लेखन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800
🌹हार्दिक अभिनंदन साहेब 🌹