पूर पूर पूर
आला अंगणात
चला मारु सूर
जाऊ पोहत प्रांगणात…..
दंगामस्ती खोड्या
सोडायच्या बाबा होड्या
कागदाच्या थोड्या
उडाल्या कवड्या…..
सूर सूर सूर
नदीवरती जाऊया
चिंब चिंब भिजूया
पाऊस गीत गाऊया…
आई म्हणाली होणार सर्दी
पाऊस लावतो वर वर्दी
भिजण्यासाठी बालक गर्दी
खेळामध्ये बालपण दर्दी….
करूया मौज मजा
होणार मग वर सजा
आनंदी बालप्रजा
कशी मिळेल शाळेस रजा…..
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220211-WA0032-150x150.jpg)
– रचना : सौ माधवी प्रसाद ढवळे, राजापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹सुंदर कविता 🌹
सुंदर कविता 👰👰👌👌👌