राग कलावती
कलावती या शब्दाचा अर्थ ‘कलांनी’ सुशोभित केलेला आहे, असा आहे. म्हणून कलावती – देवी सरस्वतीला देखील सूचित करते, जिला ज्ञान, बुद्धी आणि सर्व प्रकारच्या कलांची देवी मानले जाते.
हा एक अतिशय मधुर राग आहे आणि रागाचे सौंदर्य त्याच्या साधेपणामध्ये आहे, ज्यामुळे तो कानाला अत्यंत आनंददायी वाटतो आणि तणाव कमी करतो.
कलावती हा आधुनिक पेंटाटोनिक हिंदुस्तानी शास्त्रीय राग आहे. स्वर रे (दुसरा स्वर) आणि म (चौथा स्वर) काटेकोरपणे वगळले आहेत (वर्ज्य/वर्जित). कलावती खमाज थाटातील राग आहे. राग कलावती हा एक साधा पण मधुर राग आहे.
राग कलावती हा कर्नाटकी रागातून तयार झाला आहे. जे. डी. पत्की यांच्या मते हा राग पंडितराव नगरकर, रोशन आरा बेगम आणि गंगूबाई हंगल यांनी महाराष्ट्रात लोकप्रिय केला. बी. सुब्बा राव यांनी कोमल रे वापरून, आरोहामध्ये ग आणि नी आणि अवरोहातील नी वगळून कर्नाटक कलावती स्पष्ट केला. त्यामुळे हा राग जनसम्मोहिनी समान आहे.
कर्नाटक संगीतात, कलावती हा राग वलाची किंवा वलाजी म्हणून ओळखली जातो.
थाट : खमाज
वेळ : रात्रीचा दुसरा प्रहर (रात्री 9 ते रात्री 12)
राग कलावती मधील हिंदी गाणी
1) मैका पिया बुलावे (चित्रपट – सूर संगम, वर्ष 1985)
२) पिया नहीं आये (चित्रपट – दरवाजा, वर्ष – १९६२)
3) हम किसी से कम नहीं (चित्रपट – हम किसी से कम नहीं, वर्ष – 1977)
4) सनम तू बेवफा के नाम से (चित्रपट – खिलोना, वर्ष – 1970)
५) ये तारा वो तारा (चित्रपट – स्वदेस, वर्ष – २००४)
६) काहे तरसाए जियरा (चित्रलेखा)
७) ना तो कारवां की तलाश है (चित्रपट – बरसात की एक रात)
८) सुबह और शाम काम ही काम (चित्रपट – उल्झन)
राग कलावती मधील मराठी गाणी
१) प्रथम तुज पहाता (चित्रपट – मुंबई चा जावई)
२) जय गंगे भागीरथी
3) अनंता अंत नको पाहू
4) प्रिया आज माझी नसे साथ द्याया
5) राहिले ओठातल्या ओठात
6) जय गंगे भागीरथी
– संकलक : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मला पण लेखनाची संधी द्यावी हि अत्यंत विनम्रतेने नम्र विनंती !! 🌹💐🚩🕉️😊☺️🤗🙏
नमस्कार !! मी उद्धव रिसबूड मुक्त पत्रकार, लेखक, कवी, व्याख्याता, तळमळीचा व हाडाचा समाजसेवक / कार्यकर्ता, कार्यक्रम आयोजक…..
माझ्याकडे विविध विषयांवरील बातम्या, लेख, माहिती उपलब्ध आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मला आपली प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. तरी कृपया आपण मला भेटीची वेळ द्यावी हि अत्यंत विनम्रतेने नम्र विनंती !! माझा भ्रमणभाष : WA +919619516371 आहे.
नक्कीच. फोन करु आपणास लवकरच