कुठल्याही फिल्म मध्ये हिरो हिरोईन भाव खाऊन जातात. पण चित्रपट यशस्वी होण्यासाठी अनेक जणांची मेहनत, योगदान कारणीभूत असते. ध्वनी मुद्रकही असेच महत्वाचे असतात. जाणून घेऊ या
ध्वनी मुद्रक सिद्धार्थ कुलकर्णी यांचा जीवन प्रवास…..
मी दूरदर्शन मध्ये असताना, माझे सहकारी, फ्लोअर मॅनेजर वंदन कुलकर्णी यांचे भाऊ म्हणून माझी
सिद्धार्थ कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली.
सिद्धार्थ ने ५ वी पासून तांत्रिक विषय घेऊन १२ वी पर्यंत शिक्षण झाल्यावर तांत्रिक शिक्षणाची आवड असल्याने तांत्रिक विषय घेऊन प्रिंटिंग प्रेस मधे त्या काळी असलेले aprentiship घेऊन दोन वर्ष पुर्ण केली. पण त्यात मन न रमल्याने ते क्रिकेट कडे वळले. शिवाजी पार्कवर दिड वर्ष खेळल्यावर, अचानक त्यांना रेकॉर्डिंग स्टुडिओ मधे काम करण्याची संधी मिळाली जे काम मुंबईतील फिल्मी दुनियेशी संबंधित होते. त्यांना फिल्म इंडस्ट्री बद्दल आकर्षण असल्याने साहजिकच ती संधी त्यांनी स्वीकारली.
दोन महिन्यातच त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तांत्रिक विभागाचं अवॉर्ड मिळालं. चित्रपट होता गोविंदाचा “हत्या”.
तिथून मग ध्वनी मुद्रक, संकलक, लेखक, संगीतकार, असिस्टंट डायरेक्टर, मॉडेल/आर्टिस्ट co-ordinator, फोटो शूट, पी.आर.ओ., पब्लिसिटी प्रमुख, अशी प्रगती करता करता सिद्धार्थने एका महत्वाच्या अवॉर्ड सोहळ्याचे काम सलग २५ वर्ष केलं. अनेक हिंदी चित्रपटांची प्रसिध्दी त्यांच्याकडून केली गेली ज्यात बऱ्याच चित्रपटांचे ट्रेलर त्यांनी लिहिले. याच दरम्यान त्यांना एका संस्थेचे टेक्निकल एक्सलन्सी साठी दहा अवॉर्ड मिळाले.
सिद्धार्थ यांना हिंदी व्यतिरिक्त मराठी, साऊथ, बंगाली, गुजराती, इंग्लिश चित्रपटांची प्रसिध्दी करण्याचं भाग्य लाभले. ज्या कामाचं कुठलही औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं त्यात त्यांनी १८-२० तास काम करुन यश मिळवलं.
जवळपास ९० च्या दशकातील सर्वच चित्रपटाशी त्यांचे नावं जोडलं गेलं. त्यात मुख्यत्वे करुन सुपर हिट ठरलेले चित्रपट पुढील प्रमाणे आहेत.
हत्या, तेजाब, रामलखन, प्रेम प्रतिज्ञा, ईश्वर, मैने प्यार किया, लाल दुपट्टा मलमल का जीना तेरी गली में, घायल, दिल, बेटा, राजा, हम आप के हैं कौन, हिना, गझनी, वांटेड, पार्टनर, आणि इतर बरेच,
मराठी …
माहेरची साडी, लपवा छपवी,
इंग्लिश…rambo..
तसेच सिरियल कृष्णा, चंद्रकांता, विक्रम और वेताल, हम पांच आणि टीव्ही शो “इंडियन आयडॉल” असे विविध प्रकारचे काम करण्याची संधी त्यांना त्यांच्या अंगी गुणवत्ता असल्याने मिळाली.
सिद्धार्थ यांनी दिड वर्ष दुबईत काम केले.
या कामात ज्यात टीव्ही व्हिडीओ वॉल बनवणे, प्रोजेक्टर स्क्रीन, सीसीटीव्ही कॅमेरेइंस्टलेशन, सभागृहात ध्वनि यंत्रणा बसविणे. अशी विविध प्रकारची कामे त्यांनी केली.
फिल्मी दुनियेत असूनही केवळ त्यातच सिद्धार्थ रमले नाहीत. तर गेले पांच सहा वर्ष, ते कविताही करत आहेत. उत्कृष्ट काव्य लेखनासाठी त्यांना आठ ते दहा पुरस्कार मिळाले आहेत.
जानेवारी २०२२मध्ये भरलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते सक्रिय सहभागी झाले होते. तेव्हापासून त्यांनी साहित्य क्षेत्रात नियमितपणे काम सुरु केले आहे.
विशेष म्हणजे आपली आवड ओळखून सिद्धार्थ यांची यापुढे फक्त साहित्य क्षेत्रात आणि अभिनयात काम करण्याची इच्छा आहे.
२१ मे २०२२ रोजी ठाण्यात झालेल्या मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते सहभागी झाले असता त्यांची डॉ.जयप्रकाश घुमटकर यांच्याशी ओळख झाली. त्यांनी सिद्धार्थ यांची आवड आणि अनुभव पाहून त्यांना मराठी साहित्य मंडळात सहभागी होण्याबद्दल विचारले. त्यांनी होकार देताच त्यांची मराठी साहित्य मंडळाच्या विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्षपदी निवड केली. याबद्दल डॉ जयप्रकाश घुमटकर साहेब यांचे ते मनापासून आभार मानतात
मराठी साहित्य मंडळ विस्ताराचे काम विदर्भात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पुढे जोमाने करण्याचे सिद्धार्थ यांनी ठरविले आहे.
खरंच, फिल्मी दुनियेतील भुल भुलैयात आयुष्य भर अडकून न पडता, आपली आवड ओळखून साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या सिद्धार्थ कुलकर्णी यांचे
खरोखरच कौतुक केले पाहिजे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खुप सुंदर सिनेमा आणि साहित्याचे अनोखे मिलन मस्त 👌👌👌👌👌
सुंदर सुंदर सुंदर
देवेंद्रजी आणि अल्काजी आपण माझ्या केलेल्या कामाबद्दल थोडक्यात पण उत्तमरीत्या माहिती संग्रहित करून फोटोंसह प्रसिद्ध केलीत त्याबद्दल आपले मनस्वी आभार मानतो.. आपले असेच सहकार्य आणि आशीर्वाद यापुढेही लाभोत हिच माफक अपेक्षा…
🙏धन्यवाद🙏
सिद्धार्थ कुलकर्णी
मराठी साहित्य मंडळ
विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष
🤝🤝🤝👍