Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.

आदरणीय साहेब आपल्या लेखातून पहिल्या मराठी कवयित्री महदंबा व ढवळे हा काव्य प्रकार माहिती झाला. त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्र टाईम्स तर्फे आपला सत्कार झाला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन, किंबहुना त्या सत्काराचे महत्व वाढले असे मला वाटते. आदरपूर्वक. 🙏
– सुनीता नाशिककर.
निवृत्त पोलिस उपअधीक्षक. मुंबई

तुमचा जीवनप्रवास ! भारावून गेले. 🙏🙏
– नीला बर्वे. सिंगापूर

अंक खूप छान आहे.
नवं कोरं ..मध्ये नवीन तरुण कवी..त्यात तुमचा हृद्य सत्कार, वाचून छान वाटले. अभिनंदन व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा.

अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून सविस्तर, माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. प्रज्ञा पंडित यांनी चांगला धांडोळा घेऊन व्यवस्थित लेखन केले आहे.

“माणूस म्हणून जगताना” अप्रतिम लेख! “मी” पणाच्या अज्ञानाची इतकी आवड होते हे सत्य चांगले विशद केले आहे. राधा गर्दे यांचे अभिनंदन

तनुजा प्रधान यांनी नंदा चे जीवन चरित्र, त्यांचे चित्रपट, त्यांची गाणी सारेच उलगडून यथार्थ शब्दचित्र उभे केले आहे. आवडले.

भारती रायबागकर, यांची कविता म्हणजे शेतकऱ्यावर पडणाऱ्या संकटांची मालिका, भावपूर्ण शब्दात मांडली आहे. छान.
– स्वाती वर्तक. मुंबई.

‘Old is Gold’ आणि असा चित्रपट सृष्टीतील
सुवर्णकाळ रसिकांसमोर सही सही उभा करण्याची ताकद तनुजा प्रधान यांच्या शब्दशैलीत निश्चितच आहे.
तनुजा प्रधान यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !!!
– डॉ मधुसूदन घाणेकर. पुणे

“महानुभावांचे मराठी योगदान” या लेखाचं सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्व आहे. ताईंचे हार्दिक अभिनंदन.
– सुनील नेत्रगावकर. नांदेड

नवं कोरं खूप आवडलं, तुम्ही स्पृहा जोशीला केलेली विनंती की महादंबा यांच्या विषयी माहिती आणि त्यांच्या रचना या विषयी काही तरी उपक्रम घ्यावा म्हणून खूप छान सांगितले सर तुम्ही, आणि तुमचे ही खूप खूप अभिनंदन🪴

माझ्या जवळ ही महानुभाव पंथाच्या थोर कवयित्री महदंबा यांच्या विषयीची माहिती आणि त्यांच्या रचना आहेत पण त्या सध्या पुण्याच्या घरात आहेत लंकेत सोन्याच्या विटा असे झाले आहे. असो मी जेव्हा जाईन तेव्हा बघू तो पर्यन्त स्पृहा जोशी यांनी कार्यक्रम केला तर खूपच छान होईल👌👌👍🙏🙏🙏
– अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया

आवडलेल नवं कोरं छानच 👌👍🙏🏻
– देवेंद्र लाखोळे. ह .मू. अमेरिका

एकंदरीत ‘नवं कोरं’
प्रेक्षकांच्या मनांत कोरलं गेलं..
मला तर असं वाटतंय..
या प्रसंगी कवितेतील काव्य
एक नवं ‘कवी-प्रेक्षक प्रेम’
जुळवून गेलं!
💞
– संजीव दिघे. इंदूर

भारती रायबागकर यांची ‘कोणा घालावं गार्‍हाण’ ही कविता खूप आवडली.
निसर्गापुढे हात टेकलेल्या बळीराजाची अगतिकतेचे वास्तव दर्शन..

शिल्पा कुळकर्णी यांचा “एक ह्रद्य क्षण” हा लेख अप्रतीम आहे. अतिशय आवडला. नेमक्या शब्दांत भावना मांडल्या आहेत. लेख मनाला भिडलाय. आम्ही पण ते आई वडील आहोत ज्यांची मुलं परदेशात आहेत.
रोज ऑनलाईन बोलतो. between the lines एक भीती दोघांच्याही मनात सतत असते. आपली भेट होईल का ? शिल्पा ताईंनी नेमक्या भावना टिपल्यात,..
– राधिका भांडारकर. पुणे.

‘Vadal aani Shetkari’ by Professor Sou.Sumati Pawar, its true, reality in farming. It has become most expensive but highly risky with low rate of returns. Therefore, there is an urgent need to review the whole agril. policy and support………
– Pro Dr D V Kasar, Pune.

मा.भुजबळ सर, संपादक नमस्कार,
“माहिती” तील आजच्या आठवणी मनापासून आवडल्या. धन्यवाद.
– बी डी गायकवाड. पत्रकार, शहापूर

‘राग कलावती’ ची माहिती छान झाली आहे. मराठी हिंदी गाणीही दिली आहेत. कॉलेजात असल्यापासून डॉ. प्रभा अत्रेंचे राग कलावती मधील “तन मन धन तोपे वारू” ऐकत आले आहे. त्याची आठवण आली. 🙏🌹
– अलका अग्निहोत्री. नवी मुंबई

प्रिया मोडक
राग कलावती खूप छान सांगितली माहिती मी काही गाणी त्यातली विसरले होते, पण इथे वाचून खूप आनंद झाला. 😊🙏👌
– अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया

‘चित्रसफर’ मधे वर्षा उसगांवकर वरील लेख वाचून पुढील प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत

चित्रसफर मधे वर्षा उसगांवकर वरील लेख वाचून जुने दिवस आठवले. अनेक आठवणी जाग्या झाल्या.लेख खूप छानं लिहिलाय.
– श्री महेश अस्वले. संगमनेर

जुन्या आठवणी ताज्या – तवाण्या झाल्या. गंमत जमत या चित्रपटाने खूप धमाल केली होती. मी स्वतः व आमचे मित्र थिएटर मध्ये जाऊन ३ ते ४ वेळा चित्रपट पाहिला होता.
– श्री अविनाश ठाकूर. मुक्तांगण मित्र, राहुरी

मस्त लेखन केलंय संदीप 👌👌
– प्रोफेसर सुशीलकुमार दुसाने, मुंबई

फुंकर  शुभदा दीक्षित यांच्या, लेखा संबंधी आलेल्या प्रतिक्रिया…

व्वा शुभे, सुरेख लेख, विषयच अगदी हळुवार, त्यावर तुझ्या साध्या गोड शब्दांची फुंकर घालून तो असा काही फुलवलास की ती मैत्रीची फुंकर मनाला शांतवून गेली 💞👏👏💞 येत राहू देत असे छान छान लेख 👍🌹
– कुमुद राळे

फुंकर फारच छान घातली आहेस वाचकांच्या मनावर विविधरंगी मायेची..
– सुनंदाताई पानसे

शुभदाताई, आत्ताच तुमची शब्दरूपी फुंकर माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. आभसी जगात ही प्रेमळ फुंकर किती दुरपर्यत जाऊन पोचते ना ! मनाला आल्हाद देऊन जाते. मैत्र आणखी घट्ट झाल्यासारखं वाटतं. थंडीमधे ऊब आणि उन्हाळ्यात गारवा द्यायची किमया आहे तिच्यामधे. तुमची लेखनशैलीहि प्रासादिक आहे. तुमच्या लेखांचं एक छान पुस्तक होऊ शकतं. शुभेच्छा
– सुषमाताई कर्वे

शुभदा, किती किती पैलू दाखवलेस आपल्या साध्या फुंकर घालण्याचे. खूप छान लिहिलं आहेस.
– नीता आगाशे

शुभदा, फुंकर लेख आलडला. शेवटच्या चार ओळी वाचून डोळे पाणावले. येथे मैत्रिणींची उणिव खूपच जाणवते.
– रेखाताई खाडीलकर

– संपादन : टीम एनएसटी. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments