आज दीप अमावस्या आहे. त्यानिमित्ताने काही कविता…
१
🪔 दिपदान 🪔
पुर्व दिशेला रवीदिप उजळला
अवघा चराचर प्रकाशात न्हाहला
तिमीरातूनी तेजाकडे निघाला🪔
ज्ञानाचा एक दिप चेतवू
आज्ञानाचा अंधकार घालवू
सकलांना मतीप्रकाश दावू 🪔
दिप चेतवून करू औक्षण
शतायुषाचे मागू वरदान
शुभदिवसाची ठेवू आठवण 🪔
जाता जाता दोन दिप दान करू या
अंधाच्या जीवनीही प्रकाश आणूया
सुंदर सृष्टी त्यांना दावूया 🪔
दिपदान, दिपमान, दिपपुजन
संस्कार आपुले करुया जतन
प्रकाशापुढे अंधाराचे होवो पतन
या तेजोदिपास त्रिवार वंदन त्रिवार वंदन !!!!!🪔
– रचना : आशा दळवी. फलटण
🪔🪔🪔🪔🪔🪔
२
निरंतर प्रकाश
मी एक दिवा लावीन,
भरपूर अंधार हो जिथे,
मी निरंतर प्रकाशेन हो,
इतरांना आधार ईथे,
गोंधळलेल्या व्यक्तीला,
मी खरी ती दिशाही देईन,
भांबावलेल्या तरूणांची,
उज्वल निश्चित आशा होईन,
माझे जळणे अन झिजणे,
काहींसाठी नवी जाण ती,
काही प्रेरणा घेऊन माझी,
अंधारातून लावती पणती..!!!
– रचना : हेमंत भिडे. जळगाव
३
“दीप”
ज्ञानदीप लावू या जगात
अज्ञानाचे तिमिर जावोत।।ध्रु।।
प्रेम ज्ञान देत दीपज्योत
त्याग एकाग्रता शिकवीत
सद्गुण अविचल रहात।।1।।
प्रकाश अंधार ना पहात
सूर्याला रात्र ना दिसत
चैतन्य देई दीप सतत।।2।।
उंबर्यावर दीप ठेवूया तेवत
उजेड पडेल बाहेर आंत
मिळे वैराग्य शुद्धता सुखद।।3।।
लावतात दीप सर्व कार्यांत
तमोगुण विक्षेप जाळीत
प्रज्वलन हवा करीत शुद्ध।।4।।
– काव्य : अरुण गांगल. कर्जत, रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹सर्व कविता खूप सुंदर 🌹
छान छान..!
दीपज्योति: परब्रम्ह दीपज्योति: जनार्दन: |
दीपो हरति मे पापं, संध्यादीप नमोSस्तु ते||🙏🙏