पाखरांची भरारी
आसमंत भेदणारी
पंखांना बळ देणारी
तूच तर आहेस…
सृष्टीच सजीवपण
शतकोटीच जगण
पहिला श्वास देणारी
तुच तर आहेस...
दिव्य शक्तीपीठ
जगाची उलथापालथ
शक्तीस पोसणारी
तुच तर आहेस…
होरपळतेस घुसमटतेस
दुशनांच्या आगीत
प्रसव वेदना रेटणारी
तूच तर आहेस …
अश्रूत बुडतेस
मरुनही जगतेस
अमृत पाजणारी
तुच तर आहेस…
– रचना : सौ.उषा भोसले. लातूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹अप्रतिम काव्य 🌹
खुप सुंदर कविता 👌👌👌