कवियत्री पद्मजा ओक यांचे पुत्र आर्मी मध्ये होते. पाच वर्षांपूर्वी ते लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाले.
कारगिल युध्दाच्या वेळी ते कारगिल मध्येच होते.
नुकताच कारगिल विजय दिवस झाला. त्याची आठवण म्हणुन केलेली कविता पुढे देत आहे.
– संपादक
वीरांची ही वीरगाथा
पुत्रांचे बलिदान
आप्तांची ती शोक गाथा
झाले जरी गुणगान।
वीर निघाले बलिदानास्तव
रणक्षेत्रही जगावेगळे
करण्या नामोहरम शत्रूला
साहस त्यांचे अति आगळे।
हिमवृष्टीचा झेलत मारा
दोरावरुनी चढले डोंगर
धूळ चारली वैऱ्यां ना
अन ध्वज फडकला त्या हिमशिखरावर ।
कितीक झाले शहीद त्यास्तव
गणती नसे त्याला
शस्त्रांचे किती घाव झेलले
कळती ना कोणाला ।
जखमा सोशीत प्राण पणाने
पडले धारातीर्थी
देशास्तव केवळ दिली
अमोल प्राण आहुती ।
उरल्या भळभळत्या जखमा
दिसल्या फक्त आप्तजनास
काळ कितीही निघून जावो
शल्य उरे हृदयात ।
बलिदानाने झाले पावन
कृतार्थ झाले त्यांचे जीवन
कर्तव्यास्तव प्राण अर्पिले
अजून त्यांची असे आठवण।
जय हिंद !!!!
– रचना : पद्मजा ओक
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वा. अतिशय सुंदर
खुप भावनीक कविता ,,कारगिल विर ,,😘😘🙏🙏