मुंबईतील प्रख्यात एच. आर. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच वरळी येथील दूरदर्शन सह्याद्री केंद्राला भेट दिली. ही भेट महाविद्यालयाच्या औद्योगिक भेटी अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
ह्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना दूरदर्शन सह्याद्रीचे एकूण कामकाज कसे चालते हे जवळून पाहण्याची संधी मिळाली.
विद्यार्थ्यांनी या भेटीत केंद्रात कोण कोणते विभाग आहेत, त्यांचे काय काम असते, ते कसे काम करतात अशा विविध बाबींची माहिती घेतली. या विद्यार्थ्यांना कॉन्फरन्स रूम, कॅमेरा, आय. टी. विभाग, उपग्रह संचालन केंद्र, स्टुडिओ, ग्रंथालय, बातमी विभाग, ऑडियो- व्हिडिओ विभाग, इत्यादी सर्व पाहण्याची संधी मिळाली. एवढेच नाही तर, त्यांना एक वाजता थेट प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहण्याचा देखील अनुभव घेता आला.
ह्या भेटीचे आयोजन करण्यात प्रा जस्मिन तांबोळी यांनी पुढाकार घेतला होता. तर दूरदर्शनचे माजी निर्माते देवेंद्र भुजबळ यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली.
दूरदर्शन सह्याद्रीचे कार्यक्रम कार्यकारी श्री भारत हरणखुरे यांनी या भेटी साठी सर्वतो परी सहाय्य केले. तर, ह्या भेटीदरम्यान विद्यार्थ्याना केंद्राची योग्य माहिती देण्याचे काम गोपाळ वाघ यांनी केले.
विद्यार्थ्यांशी या भेटीबाबत संवाद साधता, ते ह्या भेटीबद्दल भरभरून बोलले. ‘तिथे गेल्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्हाला खूप चांगला अनुभव मिळाला. प्रत्येक विभागाचे काम कसे चालते ह्याची अगदी योग्य माहिती वाघ सरांनी दिली, त्यामुळे एकूण काम समजून घेणे अगदी सोपे झाले.’
स्टुडिओ १ व २ मधून विविध नामांकित कार्यक्रम जसेकी सखी सह्याद्री चे प्रसारण होते.
तर ग्रंथालय विभागात झालेल्या कार्यक्रमांची नोंद व जोपासना केली जाते.‘ ही भेट महाविद्यालयीन जीवनातील एक अविस्मरणीय भेट राहील.’, इत्यादी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून मिळाल्या.
– लेखन : अदिती चाळके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
Very good…. article….keep… posting
Very Nice Article 👍