रिमझिम पावसात भिजण्यास
श्रावणात घन निळा बरसला
इंद्रधनुची कमान सजवून
हिरवा शालू मिळे अवनीला
श्रावणात येई उधाण सणाला
माहेरची ओढ लागे नववधूला
मन झोके घेई माहेरच्या अंगणी
मेंदीचा रंग चढे तिच्या हाताला
मायबापा ची लाडाची लेक
येता घरी होई साजरा सण
माहेरचे सुख देण्या घेण्यास
येतो तिला हा श्रावण श्रावण
मायबाप दादा वहिनी उभे सारे
होऊनी सज्ज तैनात तिच्या समोर
बाप आभाळ तर माय धरणी
येई प्रेमाला भरभरून मोहर
आज येता सण सारे आनंदाचे
तिचे डोळे पाणावले आठवणीत
प्रश्नांनी काहूर माजवले डोक्यात
शोधीत राहीली मनाच्या गाठोड्यात
वाट पाहुनी थकलेले डोळे
आज दिसतील का पुन्हा तिला
दाराशी नजर लावून बसलेली
माय मिळेल पुन्हा या माहेरवाशिणीला
– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन: देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
व्वा अतिशय सुंदर कविता