महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी सतीश त्रिपाठी अध्यक्ष असलेल्या, सेतू चॅरिटेबल ट्रस्ट, या स्वयंसेवी संस्थेद्वारा संचलित, मुंब्रा जि ठाणे, येथील केंद्राच्या वतीने नुकताच आयोजित केलेला सेतू फेस्टिवल, विविध आणि भरगच्च कार्यक्रमांनी चांगलाच रंगला.
सेतू ट्रस्ट च्या मुंब्रा केंद्रामार्फत महानगर गॅस लिमिटेड
(एम जी एल) या कंपनीच्या आर्थिक साहाय्याने, वंचित समाजातील मुले, विद्यार्थी आणि युवती यांच्यासाठी अनुक्रमे बालवाडी, शिकवणीचे वर्ग आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचे वर्ग चालविले जातात.
अत्यंत उपयुक्त असलेल्या या उपक्रमांमधून चालू वर्षी 20 विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला. तर ट्रस्टच्या कोचिंग क्लासेस मधील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी पैकी कु. मंसुरी हकीम अली आणि कु.फातिमा शेख या विद्यार्थिनीनी मुंब्रा येथील सूमय्या हायस्कूल या शाळेत अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. तर व्यावसायिक प्रशिक्षण वर्गा मधून 40 युवतींनी शिलाई मशीन चे प्रशिक्षण घेवून स्वतःच्या घरीच टेलरींग व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून या युवती दररोज किमान रु 400 ते 500 ची कमाई करीत आहेत. यापैकी काहींना तयार कपडे पुरविण्याच्या ऑर्डर्स सुद्धा मिळत आहेत.
सेतु च्या या गुणवंत, विद्यार्थी-मुले, मुली आणि युवतींना प्रमाणपत्रे, भेटवस्तू देवून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचे कलागुण प्रदर्शित करण्यासाठी मुंब्रा येथील, नुर बाग सेरेमनी हॉल, येथे एक दिवसीय, सेतू फेस्टिवलआयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ओएनजीसी, मुंबई चे जनरल मॅनेजर श्री जागेश सोमकुवर, तर विशेष निमंत्रित म्हणून संस्थेचे विश्वस्त, निवृत्त कृषी संचालक श्री अशोक लोखंडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात सेतू, विद्यार्थी विद्यार्थीनीनी, पर्यावरण संरक्षण, सिंधुताई सपकाळ यांचे जीवन दर्शन, विविध विषयांवरील छोटी भाषणे, कुराण प्रश्न मंजुषा, नाटूकली इत्यादी विविध कला प्रदर्शनातून प्रेक्षकांची मने जिंकली, या कार्यक्रमात, सेतू च्या विविध उपक्रमांचे आणि कलाविष्कारां मध्ये भाग घेतलेल्या आणि बालवाडी, शालांत परीक्षा तसेच व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थीनी चे कौतुक करून सेतूच्या पुढील उपक्रमांसाठी ओएनजीसी च्या माध्यमातुन आर्थिक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन प्रमुख पाहुणे जागेश सोमकुवर यांनी दिले.
या सबंध कार्यक्रमाचे प्रायोजक श्री नासीर बुबेरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, सेतू ट्रस्टचे अध्यक्ष सतीश त्रिपाठीजी हे प्रशासनातील लोकसेवक असून, या संस्थेच्या सर्व उपक्रमांना मदत करण्याची हमी दिली. कार्यक्रमाचे सुरेख संचलन फरिहा अन्सारी यांनी केले.
या कार्यक्रमास बांधकाम व्यावसायिक नासीर बुबेरे, सलीम टोले, परफेक्ट हेल्प या स्वयं सेवी संस्थेच्या शबाना शेख आणि विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेतू, मुंब्रा केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक समीर अली, समाज सेवक अकील ताडे यांनी मेहनत घेतली.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
👌👌👌👌👍छान