कै. पंडित जसराज यांची प्रथम पुण्यतिथी दि.१७ ऑगस्ट रोजी झाली. त्या निमित्ताने, त्यांच्या रूपात कवियित्री अरुणा मुल्हेरकर यांना प्रत्यक्ष भगवान विष्णूंचे दर्शन घडल्याचा अनुभव आला होता.
पंडित जसराज यांना कवियित्री अरुणा मुल्हेरकर यांनी वाहिलेली ही शब्दसूमनांजली….
सूर कोमल भक्तीमय ते
ऐकता मन हरखले
पाहुनिया विष्णूरूपा
भान माझे हरपले
तेजोमय छबि न्यारी
गगनी सूर्य तळपतो
किरणांच्या प्रकाशात
विश्वाला उजळतो
स्वरलहरी कंठातुनी
श्रोते आम्ही बेधुंद
सरितेचा जणू प्रवाह
शीत शांत संथ मंद
वस्त्र रेशमी परिधान
गळा शोभती मौक्तीकमाला
आकाशीचा रविराज तो
गान मार्तंड भूवरी आला
सर्वसाक्षी परमेश तो
ज्ञात नामे जसराज
कृष्ण गायन भक्तीभावे
कंठात विलसे स्वरसाज
धन्य धन्य जाहले
काव्यपुष्प हे तुम्हास अर्पण
पंडितजी आपणा
सादर वंदन सादर वंदन

– रचना : अरूणा मुल्हेरकर. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेख काव्यरचना. गानभास्कराची तेजस्वी प्रतिमा
साक्षात् काव्यसुमनांतूनु अवतरली..