समाजातील विविध क्षेत्रात व्रतस्थ म्हणून कार्यरत व्यक्ती आणि संस्थाना नुकतेच नवी मुंबईत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात गौरविण्यात आले.
कोकण विभागात गेली ११ वर्षे कार्यरत असलेल्या आई प्रतिष्ठानच्या श्री अमित जाधव यांच्या कल्पक नियोजनातून हे पुरस्कार प्रदान केले जातात.
शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या सानपाडा येथील विवेकानंद शैक्षणिक संकुलाकरिता हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी यांनी स्वीकारला.
आपल्या मनोगतात डॉ. जोशी यांनी आई प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक केले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
या नेत्रदीपक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते विवेकानंद संकुलातील पूर्वप्राथमिक मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी साकारलेले मंगळागौर नृत्य.
पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सागवेकर मॅडम आणि शिक्षिका सौ. भारती टावरे मॅडम यांच्या विशेष प्रयत्नातून या मंगळागौर नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.

– लेखन : संजय पालकर
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800