२३ ऑगस्ट या जागतिक वडापाव दिनानिमित्त वडापावची थोरवी, इतिहास, वैशिष्ट्य विशद करणारे दीर्घ काव्य, आपल्याला नक्कीच वडापावची आठवण करून देईल..
– संपादक.
मी मुंबईचा वडापाव
असा मी मुंबईचा वडापाव
जगात झालंय माझं नाव
खाऊ लागलो भाव
कारण वाढू लागला माझा भाव
आज मी झालो ५६ वर्षाचा
अजूनही मी लज्जतदार
चविष्ट माझं नाव
असा मी मुंबईचा वडापाव
जगात झालंय
माझं नाव
लुसलुशीत पाव
लाल- हिरवी- पिवळी- गोड चटणी
आणि तरीही
सोबतीला मिरची
मी कुरकुरीत
तळलेला वडा
मी म्हणजे मुंबईकरांचा विक पॉइंट वडा
अस्सल देशी
फास्टफूडचा ताव
असा मी मुंबईचा
वडा पाव
जन्म माझा
१९६६ सालचा
दादर स्टेशनबाहेर गाडीवरचा
जन्मदाते श्री अशोक वैद्य
यांच्या हातचा
माझे नामांतर झाले बटाटावडा पाव
तेव्हा मी मिळे
१० पैशाला, आणि आता तर
१०- ५०-८०/- रुपयांचा अधिक भाव
असा मी मुंबईचा…..
दादर- परळ- गिरगावाची शान
वरळीचा तर मी अभिमान
रोजंदारीचा नी पोटाचा मला बहुमान
मला रेल्वे स्थानक – एस टी डेपो –
बस आगारात मान
कमी वेळात
सर्वांना सापडे
मी वडापाव
असा मी मुंबईचा…..
आहे मी
गरिब- श्रीमंतांचा लाडका
महिला, पुरुष, वयांत भेदभावाचा ना तडका
पोटाची खळगी भरायला नसे कोणी कडका
नाष्टात- जेवनात,
जिथं कमी तिथं मी भडका
कमी पैशात पोटभरणारा मी वडापाव
असा मी मुंबईचा…..
किर्ती काॅलेज बाहेर बेसनाच्या चुरासह वडापाव
ठाण्याच्या कुंजविहारचा जम्बो वडापाव
ठाण्याच्या दुसऱ्या ठिकाणचा
गजानन वडापाव
कल्याणचा वंझे कुटुंबाचा
खिडकी वडापाव
वरळीच्या मांजरेकरचा वडापाव
असा आहे नावलौकिक मी शिववडा पाव
असा मी मुंबईचा…..
परदेशात ही मी
फिरु लागलो
बर्गरला मी टक्कर
देऊ लागलो
चीज- नाचो- शेजवान- मेयोनिज-
जम्बोकिंग अशा नावांत मी दिसू लागलो
असा मी आहे
ब्रॅण्डेड वडापाव
असा मी मुंबईचा…..
अमेरिकेच्या ‘हॅरिस सोलोमन’ विद्यार्थ्याने
माझ्यावर पीएचडी केली
मुंबईच्या रिझवी काॅलेजचे २ विद्यार्थ्यांनी
लंडनमध्ये श्री कृष्ण वडापाव नावाचे हाॅटेल काढले
दर वर्षाला ४ कोटींहून अधिक कमावले
इंटरनेटवर माझे स्टाॅल- हाॅटेलचे पत्ता दिसे
सर्व क्षेत्रात पसंतीस दिसे मी वडापाव
असा मी मुंबईचा
कोरोनात केले मला तडीपार
सर्वांचीच झाली उपासमार
आली आठवण सर्वांना माझी फार
आणि आता लाॅकडाऊन उघडल्यावर
आनंदीत झाले सर्व वार
मी पुन्हा आदराने वावरु लागलो
मारा आता ताव
असा मी मुंबईचा
सर्व धर्म समभाव
एकच वडापाव 🚩
आपल्या सर्व भारतीयांना आणि, परदेशातील खवय्यांना जागतिक वडापाव दिनाच्या हार्दिक हार्दिक खमंग शुभेच्छाऽऽऽ !!

– रचना : विलास देवळेकर. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
लेख आवडला.माहिती मजेशीर आहे
अप्रतीम वडा पावची महती