आज प्रसार माध्यमातील तंत्रज्ञान फार बदललेले आहे. पण तत्पूर्वी छायाचित्रं, दूरदर्शन ची कॅसेट, अन्य तातडीचे संदेश, पत्रे पाठवण्यासाठी किती यातायात करावी लागायची याचे चित्र निवृत्त छायाचित्रकार यांच्या आजच्या “माहिती”तील आठवणी” वाचून नक्की येईल.
– संपादक
“मोटर सायकल रायडर”
हे आपण फार जुन्या इंग्लिश सिनेमा व इतर ठिकाणी बघत आलो आहोत. ब्रिटिशांनी आपल्या सर्व सरकारी खात्यामध्ये मोटार सायकल रायडर ठेवले होते. लष्कर असो पोलीस असो इतर महसूल विभागाची कार्यालये असो, सर्वांची पत्राची त्वरित देवाण घेवाण करण्यासाठी या मोटर सायकल रायडर चा फार उपयोग होत असे. मोटर सायकल मुळे पत्रे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात लगेच देण्यात येत होती. हीच परंपरा पुढील काळात सर्व सरकारी कार्यालयात जिथे आवश्यकता आहे तिथे ठेवली.
आमच्या माहिती व जनसंपर्क विभागात ही परंपरा आमच्या विभागाने कायम ठेवली. या मोटार सायकल रायडर यांचा आम्हाला खूपच उपयोग होत असे.
पूर्वीच्या काळी आत्ताप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. परंतु आमच्या विभागाची शासनाची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे आम्हाला विविध कार्यक्रमांचे फोटो व बातमी लवकरात लवकर वर्तमानपत्रांना पाठवणे आवश्यक असे. हे काम आमचे मोटरसायकल रायडर उत्तमच करत असत.
काही जुन्या गोष्टी सांगतो. पूर्वी रेडिओ फोटो म्हणून एक प्रकार होता. त्यावेळी आमचे मोटर सायकल रायडर आमच्या शासनाच्या फोटोग्राफीच्या लॅबमधून ब्लॅक अँड व्हाईट चा फोटो घेऊन भारत सरकारच्या टेलिग्राम च्या कार्यालयात फाउंटनला नेत असत व तिथून हा फोटो काही ठिकाणी पाठवला जात असे.
बराच वेळा कार्यक्रम मंत्रालयापासून खूप लांब असे. अशा अत्यंत महत्वाच्या कार्यक्रम प्रसंगी हे रायडर आमच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन फोटोग्राफर कडून फिल्म चा रोल घेऊन मंत्रालयात जात व तेथे आमचे सहकारी पुढील प्रक्रिया करत असत व फोटो व बातमी आमच्यातर्फे सर्व वर्तमान पत्राला टायमावर मिळत असे.
बराच वेळा महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री अथवा इतर महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जात असू. त्यावेळी कार्यक्रम संपला की आम्ही फोटो काढलेला फिल्म रोल आमच्या अधिकाऱ्यांकडे द्यायचो. ते अधिकारी मुंबईत येणाऱ्या हेलिकॉप्टर मधील अधिकाऱ्यांकडे देत असत. आमचे मोटरसायकल रायडर ते हेलिकॉप्टर राज भवन येथे आल्यावर तेथून फिल्म ताब्यात घेत व मंत्रालयात आणत. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होत असे. हे सिंक्रोनाइज इतके उत्तम जमले होते की आमचे ड्युटी ऑफिसर मोटरसायकल रायडर फोटो ऑफर अथवा टीव्ही कॅमेरा या सगळ्यांचा टाइमिंग करेक्ट होत असे. शपथविधी समारंभ अथवा महत्त्वाचे समारंभ यावेळी आमचे रायडर आमच्या फोटो विभागातून फोटो घेत. ड्युटी ऑफिसरला सांगून दादर येथे पुण्याला पाठवण्यासाठी मुंबई- पुणे टॅक्सी स्टॅन्ड वर संबधित टॅक्सी वाल्याकडे तो फोटो देत असत.

नाशिकला फोटो देण्यासाठी आमचे ड्युटी ऑफिसर या रायडर तर्फे टॅक्सी नंबर पुणे व नाशिकला कळवत असत. ही क्रिया प्रक्रिया इतकी सहज असे ही आमची नेहमीची प्रसिद्धीची पद्धत झाली होती व ती यशस्वी व्हायची.
माझ्या आठवणीतल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे माजी पंतप्रधान कैलासवासी राजीव गांधी यांना श्रीलंकेमध्ये नेव्हीच्या सैनिकाने त्यांना सलामी देताना बंदुकीचा दस्तक मारण्यासाठी उगारला होता. पण ते सुखरूप त्या म्हणून वाचले होते.
राजीव गांधी त्यावेळी श्रीलंकेहून मुंबई विमान तळावर आले होते. तो फोटो फार महत्त्वाचा होता. संध्याकाळ झाली होती. मी हा फोटो काढला व आमच्या अधिकाऱ्याने माझा रोल विमानतळ बाहेर उभा असलेल्या आमच्या मोटर सायकल रायडर कडे दिला. त्यांनी तो त्वरित मंत्रालयात आणला व पुढील कार्यवाही पूर्ण झाली. हा फोटो त्या दिवशी खूप महत्त्वाचा होता.
त्याचप्रमाणे अमेरिकेच्या विमानाचे हायजॅक झाल्यावर काही दिवसांनी त्यातील काही पॅसेंजर सहार या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. त्याचप्रमाणे आमच्याबरोबर काम करणारे एक सीनियर पत्रकार त्यांची मुलगी पण या घटनेमध्ये निधन पावली होती. हे सर्व सहार विमानतळावर आणले होते. त्यादिवशी एअरपोर्टवर खूप गर्दी झाली होती. व्हीआयपी, लोकांचा आक्रोश या सर्वांचे फोटो काढायचे होते. मी काही फोटो काढले व आमच्या अधिकाऱ्याने त्यातील एक रोल आमच्या मोटरसायकल रायडर मार्फत मंत्रालयात आणला. त्यामुळे आमच्या ड्युटी ऑफिसरने फोटो व बातमी लवकरात लवकर वर्तमानपत्राला पाठवली.
वर्ल्ड कप घेऊन कपिल देव आले त्यावेळी सुद्धा सहार एअरपोर्टवर माझा रोल मोटर सायकल रायडरला दिला. तो त्यांनी त्वरित मंत्रालयात नेऊन पुढील कार्यवाही केली.
ही मोटर सायकल रायडर आमच्या प्रसिद्ध विभागाची एक मोठी शान आहे व पुढे देखील राहील हा माझा विश्वास आहे.
मला व्यवस्थित लिहिता येत नाही. यातील चूक व व्याकरण समजावून घ्यावे ही विनंती 🙏
– लेखन : गिरीश देशमुख. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800