माझी आय साधी भोळी
पण लय गुणांची
कधी हसवी कधी रडवी
हाथ मायेचा कायम पाठीशी
अशीच होती माझी आय.
लाख मोलाची,
ना कधी चिडणारी
तोंड आमचे बंद करणारी
थकून दमुन तरी उत्साही
अशीच होती माझी आय
शब्दात वजन,
डोळ्यात माया
कणखर बोल,
लडिवाळ हळूच
न सांगता भाव ओळखनारी
अशीच होती माझी आय

– रचना : अशोक बी साबळे पाटील. अंबरनाथ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
