Friday, December 26, 2025
Homeलेख"माहिती"तील आठवणी ( १७ )

“माहिती”तील आठवणी ( १७ )

दीपक तुळसकर
आतापर्यंत आपण “माहिती”तील आठवणी
या मालिकेत अनेक जणांच्या आठवणी वाचल्या आहेत.

माहिती खात्यात जवळपास 40 वर्ष सेवा करून अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले, कोकणातील सिंधदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तुळस या गावाचे सुपुत्र, श्री. दीपक तुळसकर यांचे २७ ऑगस्ट २०२२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी जाहिरात शाखा/ वृत्त/ लेखा/आस्थापना शाखेतही काम केले होते. एक लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, वरिष्ठ, कनिष्ठ, जनता आणि जो जो संपर्कात येईल त्याच्याशी मैत्र जोडणारे, मंत्रालय बँकेचे दोनदा संचालक राहिलेले दीपक तुळसकर यांच्या विषयीच्या आठवणी आज आपण वाचणार आहोत.

श्री तुळसकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत समजताच त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध व्हॉट्सॲप ग्रुप्स वर उस्फुर्त पणाने, श्रद्धांजली वाहताना या आठवणी जागवल्या आहेत. त्या पुढे देत आहे. श्री दीपक तुळसकर यांना आपल्या पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली….
– संपादक

श्री दीपक तुळसकर यांच्या निधनाची बातमी ऐकून मनस्वी दु:ख झाले. माझा अणि त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता.
Agro Expo 77 या दिल्लीत भरलेल्या प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनात आम्ही एकत्र काम केले होते. अत्यंत कर्तव्यदक्ष असा सहकारी, मित्र गमावल्याचे दुःख मी विसरु शकत नाही.
– निरंजन राऊत
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक

दिपक तुळसकर व मी न्युजमध्ये एकत्र काम केले आहे. एक चांगला मित्र गेला. भावपुर्ण श्रद्धांजली.
– सदाशिव कांबळे
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक

Deeply saddened to know About his passing away. He was one of my close friend. In those days when i was in Directorate of Languages i was also working as union activist n his arena of work was our cooperative Bank. Since then till today we were in touch on mobile. His daughter is also working in media fraternity. My family shares the grief. Heartfelt condolences to his near n dears.
– Ranjitsinh Chandel
Retd. Dist.Inf. Officer. Yavatmal.

दिपक तुळसकर साहेबांना विनम्र अभिवादन.
नागपुर विधीमंडळ अधिवेशनात 7/7 बँरेक मध्ये हिवाळी अधिवेशन काळात त्यांचा सहवास लाभला. मा व ज स मधील एक अनुभवी, अभ्यासु मार्गदर्शक हरपला. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
– विजय होकर्णे. छायाचित्रकार, नांदेड

दिपक यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
– सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक. नाशिक

अतिशय शांत, मनमिळावू, सहकार्य करणारे व्यक्तिमत्व होते तुळसकरजी. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻😔
– मनोज सानप
जिल्हा माहिती अधिकारी. अलिबाग

मी मंत्रालयात वृत्त विभागात काम करीत असता तुळसकरांचा संपर्क आला. अतिशय शांत, संयमी व्यक्तिमत्त्व होते. विनम्र श्रद्धांजली.
– बी एम कौशल
निवृत्त माहिती संचालक. नागपूर

तुळसकर अतिशय समंजस व मदतीला तत्पर होते. त्यांचा सपंर्क चांगला होता. त्यांचे असे अचानक जाणे दुर्दैवी आहे. श्रद्धांजली.
– श्रद्धा बेलसरे
निवृत्त माहिती संचालक. पुणे

निवृत्त माहिती संचालक तथा नाटककार प्रल्हाद जाधव, जेष्ठ पत्रकार सर्वश्री कुमार कदम, राजन चव्हाण, किरण नाईक यांनीही आपल्या सहसंवेदना व्यक्त केल्या.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”