मनातील मळभ दूर करण्या
मी फुलांचा जन्म घेते
उमलत्या पाकळ्यांच्या सुगंधाने
नवचैतन्याची पहाट पाहते
कोमेजलेल्या मनामनामध्ये
आपुलकीचे नाते शोधते
दुसऱ्यांचा विचार करूनी
कधीतरी आपलेपण देते
फुलांपासून जगणे शिकते
सुगंध नव्याने उधळत जाते
काट्यातून ही उमलणाऱ्या
फुलांचे हे सुंदर रुप मी घेते
फुलांची आरास सजते
वाहून स्वतःला ईश्र्वर चरणी
माझ्या गजऱ्याची बातच और
घेता हाती लाजते ही सजणी
किती छान हे माझे जीवन
प्रेमाने सर्वांना सुंगधीत करते
आपुलकीचे दुवे बनून सारे
म्हणूनच सखी मी फुल बनते

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

छान कविता