तीन महिन्यांच्या पावसाळी अवकाशानंतर दिनांक १ ऑक्टोबर २०२२ पासून राजभवन भेटीची योजना पुन्हा सुरु होत आहे.
दिनांक १० सप्टेंबर पासून राजभवनाच्या संकेतस्थळावर यासाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
राजभवन भेटीची वेळ सकाळी ६ ते सकाळी ८.३० ही असेलल. प्रतिदिवशी ३० लोकांना भेट देता येईल. 
राजभवन हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट येईल. 
राजभवन भेटीचे दिवस मंगळवार ते रविवार हे असतील.
सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असेल असे राजभवनातर्फे कळवण्यात आले आहे. तसेच दिवाळीमुळे २२ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत भेट देता येणार नाही.
खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव मिळविण्यासाठी चुकवू नये, अशीच ही राजभवन भेट असते, हे आम्ही स्वानुभवाने सांगू शकतो.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

All Bhujabal Team