निटचा निकाल तर लागला. आता पुढे एम बी बी एस चे काय ?
निटच्या परिक्षेनंतर विद्यार्थी आणि पालकांची खरी परिक्षा सुरू होते. ज्यांना अपेक्षित मार्क मिळाले ते आनंदात आहेत.
पण ज्यांना मार्क कमी पडले त्यांनी काय करावे ?
जे पालक फी किंवा डोनेशन भरू शकतात ते पाल्यांसाठी खाजगी विद्यापीठांत प्रयत्न करतील. पण ज्यांना हा खर्च झेपणार नाही त्यांचे काय ?
त्यांचेपुढे चार पर्याय आहेत
१) पुन्हा रिपीट करणे
२) परदेशात कमी खर्चात प्रवेश घेणे
३) किंवा एमबीबीएस व्यतिरिक्त ईतर वैद्यकिय शाखेत प्रवेश घेणे
४) किंवा दुसरा अन्य मार्ग निवडणे
आता प्रश्न येतो तो परदेशातील एमबीबीएस चा
परदेशात पाठवायचे तर कोणता निर्णय घ्यावा ?
आता परदेशातील प्रोव्हीजनल प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. पण कॅालेज कधी सुरू होणार ?
मुलांना कधी पाठवायचे ?
जर परदेशात पाठवायचे म्हटले तर प्रवेश घेणे आवश्यक आहे.
अन्यथा प्रतिक्षा करीत बसल्यास प्रवेशाची तारीख निघुन जाईल.
ज्या संस्थेमार्फत तुम्ही प्रवेश घ्याल त्यांचे कडून पुढे काय ?
ह्याची आधीच खातरजमा करा.
संपूर्ण सुरक्षा आणि पुढील धोरण निट समजाऊन घ्या. आणि पूर्ण खात्री व समाधान झाल्या शिवाय निर्णय घेऊ नका.
१) विद्यापीठ हे मान्यताप्राप्त आहे की नाही ?
२) एकुण फी किती ?
३) वार्षिक फी किती ?
४) होस्टेल फी किती ?
५) किती वर्षाचा शिक्षणाचा कालावधी आहे ?
६) होस्टेल,मेस,शैक्षणिक दर्जा ईतर कोणत्या सुविधा ऊपलब्ध आहेत ह्याची विस्तृत माहिती अगोदरचं घ्या.
७) परदेशात प्रवेश घेण्यासाठी कोणकोणती
कागदपत्रे आवश्यक आहेत ?
८) परदेशात जातांना सोबत अत्यावश्यक
अशा कोणकोणत्या वस्तु न्याव्यात ?
९) विमान प्रवासात किती किलो सामान सोबत
नेऊ शकतो ?
१०) संपुर्ण शिक्षण होईपर्यंत अंदाजे सर्व खर्च किती येऊ शकतो ? ह्याचीही माहिती जरूर घ्या कारण पुढील पैश्यांचे योग्य नियोजन करणे सोपे जाईल.
११) काही काही विद्यापिठात वार्षिक फी ही दोन टप्प्यात भरण्याचीही सुविधा आहे. ते ही जाणून घ्या.
१२) काही विद्यापीठांत तेथे एमबीबीएस ला मेरिटचे मार्क मिळाले तर स्काॅलरर्शिप मिळते. त्याचे नेमके स्वरूप आणि पात्रता काय ?
१३) काही पालक बॅंकेच्या शैक्षणिक लोन बाबत विचारणा करतात. पण बॅंकेने शंभरटक्के खात्री दिल्यानंतरच पुढील पाऊल टाका.
१४) ह्या व्यतिरिक्तसुध्दा काही प्रश्न असल्यास त्याची देखील माहिती घ्या.
१५) ज्या संस्थेमार्फत विद्यार्थी जाणार आहे ती संस्था तुमचेकडून त्याचे ‘सेवाशुल्क’ घेते. आणि तुम्ही संपूर्ण माहिती घेणे हा तुमचा अधिकार आहे.
१६) ह्या शिवाय ह्या संस्थेने आतापर्यंत कोणकोणत्या देशात आणि विद्यापीठात विद्यार्थ्थांना पाठवले आहे ?
१७) त्यांनी पाठवलेल्या विद्यार्थी व पालकाचा त्या संस्थेबद्दल अनुभव कसा आहे ?
१८) तसेच यंदा आपल्या परिसरातील किंवा ओळखीचे कोणते विद्यार्थी तुमच्या सोबत पाठविणार आहेत का ?
शक्य असल्यास त्यांचेशी आणि त्याच्या पालकांशी अगोदरचं संवाद साधून घ्या. म्हणजे एक दुसऱ्यांना मदत करून पुढील काळातही काही अडचण आल्यास सहकार्य करता येते
ह्या सारखे विविध प्रश्न लेकरांच्या आणि पालकांच्या मनात असतात. माझी मोठी कन्या परदेशातुनच एमबीबीएस झाली असुन धाकटी लेक सुध्दा परदेशातच वैद्यकिय शिक्षण घेत आहे. त्यामुळे मी सुध्दा ह्या प्रसंगातुन गेलेलो आहे. म्हणूनच
मला जी काही माहिती आहे ती मागील काही वर्षापासुन सेवाभावी वृत्तीने मी कोणताही मोबदला न घेता विद्यार्थी आणि पालकांना देत असतो.
अनेक त्यागी आणि सेवाभावी महानुभावांनी
लेकरांच्या ऊज्वल भवितव्यासाठी समर्पित
भावनेने शिक्षण संस्था ऊभ्या केल्या. आपल्या महाराष्ट्राची ही गौरवशाली परंपरा आहे.
त्यामुळे माझ्या मनात आले की आपण किमान ईतरांना माहिती तरी द्यावी आणि आपल्या परिने खारीचा वाटा ऊचलण्याचा प्रयत्न करावा.
ही माहिती ईतरांनाही जरूर पाठवा आणि ह्या सेवाभावी शिक्षणाच्या दिंडीचे वारकरी व्हा, ही विनंती.
पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा !
काळजी घ्या ! सुरक्षीत रहा !!

– लेखन : ॲड्. अनंत खेळकर. अकोला
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

🌹खूप छान माहिती 🌹