वर्षभर हड हड शूक शूक
ऐकणारा कावळा दिसला
फांदिवर इकडे तिकडे करत
खाली येताच हळूच हसला
मनात म्हणाला बरं झालं
प्रभू रामांनी दिला शाप
काही का असेना जन हो
स्पर्शासाठी वाढतोय ताप
त्रेता युगातला मीच गंधर्व
असाच हसलेलो रामावर
शाप भोगत जगतो आहे
लक्ष ठेवून वावर जगावर
मनुष्य मृत्यू पावतो
मोक्षासाठी याचना करतो
दूर कुठे बसलेला असतो
हाक कानी काव काव वल्गना
अखेर कुणी बोलतील इच्छा
मृतात्म्यास सद्गती देण्यासाठी
मंत्रघोष पडतात कानी
आत्मा येई मुक्त करून घेण्यासाठी
माझ्याशिवाय जन तुमचे
अडते दिवस श्राद्ध महालयी
एरव्ही उपेक्षित मी हो काक
अडवणारच ना अशा समयी
आत्म्याला तुम्ही जीवंतपणी
द्यावे ऐच्छिक सुख उपभोगा
अशी वेळ नकोय यायला
काक म्हणून यावे योगायोगा

– रचना : सौ माधवी प्रसाद ढवळे.
राजापूर, जि: रत्नागिरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जीवनाचे वास्तव्य कागदावर उतरले
🌹जीवनाचं वास्तव लिहिलं आहे आपण.
जन्माची किंमत ही जगताना कळतं नाही.