नमस्कार मंडळी, औरंगाबाद येथील प्रसिद्ध महात्मा गांधी मिशन विद्यापीठात नुकतीच दोन दिवसांची मोबाईल पत्रकारिता कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेला उपस्थित राहिल्यामुळे आम्हाला मोबाईलचा उपयोग पत्रकारितेसाठी किती प्रभावीपणे करता येतो हे प्रात्यक्षिकांसह शिकता आले, याबद्दल या विद्यापीठाचे आणि मार्गदर्शक, ज्येष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन मॅडम यांचे मनापासून आभार.
या कार्यशाळेचे प्रमाणपत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, समाजशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांच्या हस्ते देण्यात आले.
कार्यशाळेला महाराष्ट्राच्या विविध भागातून 60 पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते.
विशेष म्हणजे या कार्यशाळेच्या दरम्यान महात्मा गांधी यांचे पणतू, लेखक श्री. तुषार गांधी यांच्याशी संवाद साधण्याची अतिशय अनमोल संधी मिळाली. ही एक अविस्मरणीय बाब या कार्यशाळेमुळे घडून आली.
या कार्यशाळे विषयीची मनोगते आपण पुढील लिंक वर पाहू शकता.
– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान, अभिनंदन सर
🌹अभिनंदन साहेब 🌹