17 सप्टेंबर हा जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सागरी सीमा मंच, पर्यावरण गतिविधी या पर्यावरणवादी, सामाजिक संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
पिरवाडी समुद्रकिनारी प्लास्टीक बाटल्या- पिशव्या केरकचरा, दारूच्या बाटल्या तसेच समुद्रातून वाहून आलेला केरकचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमे अंतर्गत एकूण 500 किलो कचरा गोळा करण्यात आला.
उरण व खारघर येथील एकूण 160 स्वयंसेवकांनी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत अथक परिश्रम घेऊन उरण पिरवाड़ी समुद्रकिनारा स्वच्छ केला. शेवटी सर्वाना नाश्ता देउन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले.
पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन व्हावे, पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी, सागरी समुद्र किनारे स्वच्छ सुंदर व्हावेत हा स्वच्छता अभियान राबविण्याचा हेतू असल्याचे सागरी सीमा मंचचे सदस्य श्रीपाद कातरणे यांनी सांगितले.
कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे कामी नागाव ग्रामपंचायतचेही मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी नागाव ग्रामपंचायतचे सरपंच चेतन गायकवाड, ग्रामपंचायतचे इतर सदस्य, सागरी सीमा मंच, पर्यावरण संरक्षण गतिविधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, एनएसएस युनिट, उरण कॉलेज ऑफ कॉमर्स अँण्ड आर्ट्स, उरण व्यापारी असोसिएशन, मी उरणकर ट्रस्ट, लायन्स क्लब उरण, ग्रामपंचायत नागाव, उरण नगर परिषद, लोहाना समाज उरण, यूईएस कॉलेजचे विद्यार्थी तसेच इतर विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

सागरी स्वच्छता अभियानाबाबत हिंदी अभिनेत्री, गायिका अनुजा सहाय यांनी ही आवाहन केले आहे.
हे आवाहन आपण पुढील लिंक वर पाहू शकता.

– लेखन : विठ्ठल ममताबादे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खूप छान उपक्रम 🌹
कोणताही दिन साजरा करण ही संकल्पना अस्तित्वात आली त्यामागील उद्देश हा जनजागृती करण असा असावा. आज ठराविक मनापासून काम करणारे लोक सोडले तर बाकी राजकीय नेते नं अभिनेते हे फक्त चमकोगिरी करून जातात. 🌹
सागरी किनारा स्वच्छता, एक गंभीर समस्या आहे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हे सर्वाना ज्या दिवशी कळेल त्यावेळी सर्व प्रॉब्लेम सुटतील.