भारतीय तटरक्षक दलाच्या साहाय्याने माय ग्रीन सोसायटी ही स्वयंसेवी संस्था मुंबईत कुलाब्यापासून ते विरार पर्यंत सर्व कॉलेजांमधून गेल्या काही महिन्यांपासून सागरी किनारा स्वच्छतेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करीत आहे.
१७ सप्टेंबर या जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सागरी किनारा स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई कॅम्पस च्या वतीने कीर्ती महाविद्यालयाच्या बी ए च्या पहिल्या, तिसऱ्या वर्गांचे, बी एम एम चे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, एन सी सी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जयश्री शरदचंद्र कोठारी बिझनेस स्कूल च्या विद्यार्थ्यांनी देखील या अभियाना अंतर्गत स्वच्छतेचे काम केले.
या कार्यक्रमात कीर्ती महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा . विठ्ठल सोनटक्के, प्रा रोहन राजपकर, प्रा गौरव साळवी, प्रा. चंद्रमोहन जोशी, जयश्री शरदचंद्र कोठारी बिझनेस स्कूल चे प्रा.दिक्षित कोठारी, गिरीश पवार, संदेश गवंडी यांनीही सहभाग घेतला होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दादर भागाचे गजानन पेंडसे, बाळ कृष्ण गुरव आणि अनेक स्वयंसेवकांनी मदत केली.
माय ग्रीन सोसायटीच्या वतीने विद्यार्थ्यांना टी शर्ट आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800