अशाच एका कातर वेळी
आशा मनी भेटीची
इथवर आली त्याच साठी
ईथेच झाली भेट पहिली
उरात अजूनही आठवणी
ऊष्मा भरे अंगी आठवूनी
एकच म्हणणें त्याचे होते
ऐकावे तिने सदैव त्याचे
ओळखीची तर दोघे होते
औतार पण अलग होते
अंतःकरणे एक झाली
अहा भेट सार्थ झाली !!

– रचना : आशा दळवी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800