रंग आणि आकार जीवनात रंग भरून जीवन समृध्द करतात असे प्रतिपादन प्रा.डॉ.गजानन शेपाळ यांनी केले. ते वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड व्हिज्युअल आर्ट विभागाने नुकत्याच आयोजित केलेल्या २ दिवशीय कार्यशाळेत दृश्यकला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
दृश्यकला हे क्षेत्र रंगाकारांनी भारलेले आहे. हे सांगतांना रंगांमुळे मानवी स्वभावावर पडणारा ताणतणाव आणि चिंता यावर परिणाम कारक उपाय शोधता येतात या मुद्यावर सविस्तर विववेचन केले.
दुसऱ्या दिवशी प्रा.डॉ.गजानन शेपाळ यांनी घडीपत्र आणि भित्तीचित्रे या दोन प्रकारांची माहिती दिली. त्यात त्यांनी या माध्यमांचे प्रकार, त्यांची तत्वे, महत्व तसेच प्रचलित जाहिरात क्षेत्रातील स्थान या विषयी तसेच या माध्यमातून एखाद्या विशिष्ट विषयावर कल्पना कशी सुचते, त्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी माहिती मिळविण्यासाठी कोणकोणत्या स्त्रोतांचा उपयोग होतो अशा विविध बाबींची माहिती रंजकतेने विषद केली. दोनही कार्यशाळेत व्याख्याना नंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे डॉ.शेपाळ यांनी दिली.
डॉ.शेपाळ यांनी कार्यशाळेत दिलेली उदाहरणे समोर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःचीच असल्याचे जाणवल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी दोन दिवस छान बौद्धिक आणि कलात्मक अनुभव मिळाला.
या कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे सेक्रेटरी ॲड.आप्पासाहेब देसाई, अध्यक्ष नंदकुमार काटकर, कॅंपस डायरेक्टर प्रो.अशोक चव्हाण, प्रिंसीपल डॉ.आलम शेख, व्हिज्युअल आर्ट च्या डीन प्रा.डॉ.मुक्तादेवी मोहीते, विभाग प्रमुख डॉ.मीनल राजूरकर यांच्या सह सहयोगी कलाध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन जान्हवी सावंत यांनी केले. डीन डॉ.मुक्तादेवी मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मुंबईत इतर प्रचलित दृश्यकला महाविद्यालयांच्या तुलनेत या महाविद्यालयाच्या व्हिज्युअल आर्ट विभागामार्फत सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
रंगांमुळे व्यक्तीवर काय सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो या बाबत प्रा.डॉ.शेपाळ यांनी १८ वर्षे संशोधन केले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800