केवळ नवरात्रीत करतात
स्त्री शक्तीचा जयजयकार
तिच्या गुणांचे कौशल्याचे
असतात नारे फार
गायले जातात तिचे गोडवे
असते सर्वत्व तिच्या कौतुकाचे पाढे
तिला चंडिका,दुर्गेचे देतात स्थान
मात्र तिच्यावरच करतात अत्याचार
भाषणात असते तिला आरक्षण
प्रत्यक्षात साधे नसते संरक्षण
स्त्रिभुण हत्येचे रचतात कट
कोणत्याही निर्णयात तिचे नसते मत
हुंड्यासाठी घेतात बळी
नवऱ्याचीही चालते दादागिरी
लहान मुली ही पाहत नाही
बलात्काराने ती होरपळून जाई
सतत अन्याय सहन करणे
एवढेच तिच्या नशिबी येई
केवढा हा विरोधाभास
अहो केवढा आहे हा विरोधाभास
एकीकडे म्हणतात तिला कालिका
मागून करतात तिचीच चेष्टा
एकीकडे म्हणतात तिला सरस्वती
घरातील सर्व कामाची तिलाच सक्ती
तिच्या शिक्षणाला महत्व नाही
चूल व मूल करण्यातच ती अडकून राही
आजची स्त्री आधुनिक आहे
सर्व क्षेत्रात तिचे वर्चस्व आहे
तिच्यावर राजकारण करू नका
जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबू नका
पुरुषी अहंकार बाजूला ठेवा
तिलाही निर्णय घेण्याचे स्वतंत्र द्या
बघा कसे परिवर्तन घडेल
खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती घडेल
राणी लक्ष्मीबाई होत्या
दुर्गामातेचा अवतार
मदर तेरेसा होत्या
सहनशीलतेचे प्रतीक
इंदिरा गांधींमध्ये होते
धाडसी व्यतिमत्व
सावित्रीबाई फुले मध्ये
होते सरस्वती मातेचे रूप
ह्या सारख्या थोर व्यक्तींचा
विसर पडून देऊ नका
त्यांचा इतिहास नेहमी
डोळ्यासमोर ठेवा.
स्त्री सक्तीचा सम्मान करा
स्त्री सक्तीचा आदर करा.

– रचना : रश्मी हेडे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800