Saturday, March 15, 2025
Homeसेवाआदर्श कोमनादेवी ऑक्सिजन पार्क

आदर्श कोमनादेवी ऑक्सिजन पार्क

रायगड जिल्ह्यातील ‘सारडे विकास मंच’ च्या संकल्पनेतून तयार झालेला कोमनादेवी ऑक्सिजन पार्क, सारडे आणि त्याला अनेक निसर्ग प्रेमीनी दिलेल्या उदंड प्रतिसाद यामुळे या पार्कमधील झाडे आज पाहिली तर काही झाडे डोक्याच्या वर उंचीची झाली आहेत. परंतु दिपावली नंतर लागणारा वणवा आणि या वणव्या पासुन ही झाडे सुरक्षित रहावी यासाठी नवरात्रीच्या आधीच झाडांच्या बाजूच्या गवताची सफाई महिला मजूरांमार्फत चालु आहे.

अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी ‘सारडे विकास मंच’च्या या चळवळीत आपले मोलाचं योगदान दिल आहे. स्वतःचा वाढदिवस, मुलाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस,आई वडिलांचं स्मृती दिन अश्या निमित्याने सारडे विकास मंच कडे आर्थिक मदत देण्यात आली . त्यात श्री प्रसाद पाटील, माजी सरपंच, व शेणी तसेच त्यांच्या सौभाग्यवती स्वातीताई यांच्यातर्फे पाच हजार रु, श्री संतोष कृष्णा पाटील, सारडे नेरूळ, यांच्या तर्फे दोन हजार रू, श्री देवेंद्र पाटील, कोप्रोली ऑल कार्गो एक्झिक्युटिव्ह, दोन हजार रु, कुमार रूद्र गणेश गावंड आवरे दिड हजार रुपये या दानशूर व्यक्तींनी काही महिने, काही वर्षापूर्वी संस्थेला दिली होती. त्या रकमेचा वापर निसर्गाच्या सेवेसाठी केला गेला आहे.

या व्यतिरिक्त काही समाजप्रेमीनी आपले सहकार्य दिले आहे. पेट्रोल आणून देणं, मजुरांना चहा नास्ता देणे, मशीनचे पार्ट आणण्यास मदत करणे, असे विराट पाटील आवरे, शशिकांत ठाकूर केळवणे, रोहित पाटील, प्रितेश म्हात्रे, हरीश म्हात्रे, त्रिजन पाटील, संजय मोकळ, प्रेम शेडगे केलवणे, वैभव दादा, राकेश पाटील सर कोप्रोली रामनाथ पाटील, मिलिंद म्हात्रे, निवास गावंड सर, तसेच ग्रास कटर चालविण्यासाठी देणे हे काम निशिकांत गावंड दादा हे आपल्या घरातील समजून करत आहेत.

तर नरेश भोईर दादा, भावज्या, महिला वर्ग तसेच धर्माजी पाटील दादा, रामदास म्हात्रे दादा, श्रीमती कल्पना ताई पाटील, स्नेहा ताई पाटील, मंदाताई पाटील आणि सर्व निसर्गप्रेमी यांनी काम चालू असताना दिलेल्या बोलक्या प्रतिक्रियातुन ऊर्जा घेत हे कार्य चालू आहे. सर्वाचे ‘सारडे विकास मंच’ आणि ‘कोमणादेवी ऑक्सिजन पार्क’, सारडे तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे.

राज्य भर असे उपक्रम हाती घेणे, ही काळाची गरज आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments