आजही दबले जातात तिच्या मनातील हुकांर ।।
अस्तित्वाचा लढा देतांना
आजही ती होते बेजार ।।
स्रि भ्रुण हत्या बलात्कार।
हे प्रश्न आजही आहेत ऐरणीवर
स्रि मुक्तिचा लढा देतांना आपण फोडत आहोत दांभिकतेचा मुखवटा ।।
आजही चालत आहोत रक्त रंजीत वाटा ।।
बाई म्हणून जगतांना ।।
पैलतो अनंत आकाश ।।
जुगारुन देऊ आता ।।
रुढी आणि पंरपरेचे पाश ।।
सावित्रीने खुले केले ज्ञानाचे भंडार।।
संविधानाने दिला तिला समानतेचा अधिकार ।।
उंबर्या आतले जिवन तिचे ।।
होती कीती लाचारी ।।
शिक्षणामुळे लाभले पंख ।।
घेते गगन भरारी ।।
घेते गगन भरारी ।।
एखादी पी.व्ही.सिंधू ।।
आणते भारतासाठी सुवर्ण ।।
तर
एखादी किरण बेदी मोडुनी पुरषी अहंकार
म्हणते ।।
I DARE ।।।
I DARE ।।।
हो, तुच दुर्गा, हो तुच काली,
तुच आजची रण रागिणी ।।
आजची रण रागिणी ।।.

– रचना : स्मिता विलास लोखंडे.
– संपादन : अलका भुजबळ